नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश, राज्ये आणि खासगी रुग्णालयांमध्ये ३ कोटी २० लाख लसमात्रा शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.

आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ४३ कोटी ७९ लाख ७८ हजार ९०० लसमात्रा पुरवण्यात आल्या असून अजून ७ लाख मात्रा लवकरच देण्यात येणार आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत उपलब्ध साठ्यानुसार वाया गेलेल्या लसमात्रांसह आतापर्यंत एकूण ४० कोटी ५९ लाख ७७ हजार ४१० लसमात्रांचा वापर करण्यात आला आहे. तर ३ कोटी २० लाख १ हजार ४९० लसमात्रा शिल्लक आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.