News Flash

लशीमुळे केवळ करोनाच्या तीव्रतेत घट; तज्ज्ञांचे मत

केंद्र सरकारने म्हटले आहे, की कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लशी सुरक्षित आहेत.

कोविड १९ प्रतिबंधक लस घेतली तरी त्या व्यक्तीला कोविड विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे एकदा लस घेतली,की मुखपट्टी वापरण्याची तसेच सामाजिक अंतराची गरज नाही असा गैरसमज करून घेऊ नये. करोना लस ही सुरक्षा कवच आहे असे समजून चालण्याचे कारण नाही. ही लस घेतल्यामुळे केवळ आजाराचे स्वरूप गंभीरतेकडे झुकून त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येणार नाही, शिवाय मृत्यूंचे प्रमाण कमी होईल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दिल्ली ते चेन्नई किंवा पाटणा या सारख्या शहरात लस घेतलेल्या व्यक्तींना करोना संसर्ग होत आहे. गेल्या दोन महिन्यात अशी अनेक प्रकरणे सामोरी आली आहेत. लस घेतली की, कुठलीच काळजी करण्याचे कारण नाही हा समज योग्य नाही.

केंद्र सरकारने म्हटले आहे, की कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लशी सुरक्षित आहेत. लोकांनी अफवांना बळी पडू नये. अनेक तज्ज्ञांनी हे मान्य केले आहे, की करोनाची लस हे त्या रोगाविरोधातील सुरक्षा कवच नाही. केवळ त्यामुळे आजाराची गंभीरता कमी होऊन रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत नाही. अपोलो रुग्णालयातील पल्मनोलॉजिस्ट अवधेश बन्सल यांनी सांगितले,की लसीकरणानंतरही काहींना करोनाची लागण झाली आहे. दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही करोना झाल्याची उदाहरणे आहेत. लशीमुळे व्यक्तीची लक्षणे गंभीर होत नाहीत इतकाच फरक आहे. फॉर्टिस रुग्णालयातील पल्मनोलॉजी सल्लागार डॉ. रिचा सरीन यांनी सांगितले,की दोन्ही मात्रा दिल्यानंतरच प्रतिपिंड पूर्ण तयार होतात. त्यामुळे पहिल्या मात्रेनंतर संसर्ग होऊ शकतो. दिल्लीच्या सरकारी रुग्णालयाच्या एका डॉक्टरांनी असे म्हटले आहे, की लस म्हणजे करोनापासून पूर्ण संरक्षण असा अर्थ होत नाही. मुखपट्टी, सामाजिक अंतर हे उपाय चालूच ठेवावे लागतील.

रेल्वेच्या परिसरात मुखपट्टी न घालणाऱ्यांना ५०० रुपयांपर्यंत दंड करण्याचा आदेश जारी

रेल्वेच्या परिसरात आणि रेल्वेगाड्यांमध्ये मुखपट्टी न घालणे हा आता रेल्वे कायद्यान्वये गुन्हा ठरवण्यात आला असून अशा लोकांना ५०० रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो असे रेल्वेने शनिवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड-१९ विषयक जे दिशानिर्देश जारी केले आहेत, त्यांची अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी रेल्वेने केलेल्या उपाययोजनांपैकी ही सर्वात अलीकडची उपाययोजना आहे.

ह्यमार्गदर्शक तत्त्वांपैकी एक विवक्षित सूचना करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुखपट्टी घालणे ही आहे. भारतीय रेल्वेने ११ मे २०२० रोजी गाड्यांच्या परिचालनासाठी जी आदर्श कार्यपद्धती जाहीर केली आहे, त्यात सर्व प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेशाच्या वेळी व प्रवासादरम्यान मुखपट्टी घालण्याची सूचना करण्यात आली आहेह्ण, असे रेल्वेच्या आदेशात म्हटले आहे.

मुखपट्टीचा अनिवार्यपणे वापर आणि दंड यांचा आता संबंधित नियमावलीत समावेश करण्यात आला असून, त्यात रेल्वे परिसरात थुंकणाऱ्यांना दंड करण्याचीही तरतूद असल्याचा उल्लेख यात आहे.

रेल्वे गाड्यांसह रेल्वेच्या परिसरात सर्वांनी मुखपट्टी किंवा मुख आच्छादन वापरतील हे निश्चित करण्यासाठी, रेल्वे अधिकाऱ्यांकरवी ५०० रुपयांपर्यंत दंड करण्याची दंडविषयक नियमावलीत करण्यात आली आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

दहा राज्ये व केंद्रशासित प्रदेशात ७९.३२ टक्के नवे रुग्ण

 

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व दिल्ली यांसह दहा राज्ये व केंद्रशासित प्रदेशात करोनाचे नवे ७९.३२ टक्के रुग्ण सापडले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने शनिवारी म्हटले आहे. महाराष्ट्रात ६३,७२९ नवीन रुग्ण सापडले असून उत्तर प्रदेशात ही संख्या २७,३६० आहे. दिल्लीतील रुग्णवाढ १९ हजार ४८६ झाली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान या राज्यात ७९.३२ टक्के नवीन रुग्ण सापडले आहे. सोळा राज्ये व केंद्रशासित प्रदेशात रोज नवीन रुग्ण सापडण्याचा काल जास्त आहेत. त्यात महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरयाणा, राजस्थान, पंजाब, केरळ, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगण, उत्तराखंड, आंध्र प्रदेश व पश्चिाम बंगाल यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक व केरळ या राज्यात एकूण उपचाराधीन रुग्णांच्या ६५.०२ टक्के रुग्ण असून महाराष्ट्रात हे प्रमाण ३८.०९ टक्के आहे. लस दिलेल्यांचे एकूण प्रमाण १२ कोटी झाले असून त्यासाठी एकूण १७ लाख ३७ हजार ५३९ सत्रे घेण्यात आली. ९१ लाख ५ हजार ४२९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिली मात्रा घेतली आहे तर ५६ लाख ७० हजार ८१८ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. १ कोटी ११ लाख १४ हजार ६९ आघाडीच्या कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा देण्यात आली तर ५४ लाख ८ हजार ५७२ आघाडीच्या कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. साठ वर्षे वयावरील ४ कोटी ४९ लाख ३५ हजार ११ जणांना पहिली मात्रा देण्यात आली असून ३४ लाख ८८ हजार २५७ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. ४५ ते ६० वयोगटात ३ कोटी ९२ लाख २३ हजार ९७५ जणांना पहिली मात्रा देण्यात आली तर ९ लाख ६१ हजार ५१० जणांना दुसरी मात्रा देण्यात आली.

रेल्वेच्या परिसरात मुखपट्टी न वापरणाऱ्यांना दंड

रेल्वेच्या परिसरात आणि रेल्वेगाड्यांमध्ये मुखपट्टी न घालणे हा आता रेल्वे कायद्यान्वये गुन्हा ठरवण्यात आला असून अशा लोकांना ५०० रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो असे रेल्वेने शनिवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड-१९ विषयक जे दिशानिर्देश जारी केले आहेत, त्यांची अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी रेल्वेने केलेल्या उपाययोजनांपैकी ही सर्वात अलीकडची उपाययोजना आहे.

ह्यमार्गदर्शक तत्त्वांपैकी एक विवक्षित सूचना करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुखपट्टी घालणे ही आहे. भारतीय रेल्वेने ११ मे २०२० रोजी गाड्यांच्या परिचालनासाठी जी आदर्श कार्यपद्धती जाहीर केली आहे, त्यात सर्व प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेशाच्या वेळी व प्रवासादरम्यान मुखपट्टी घालण्याची सूचना करण्यात आली आहेह्ण, असे रेल्वेच्या आदेशात म्हटले आहे.

मुखपट्टीचा अनिवार्यपणे वापर आणि दंड यांचा आता संबंधित नियमावलीत समावेश करण्यात आला असून, त्यात रेल्वे परिसरात थुंकणाऱ्यांना दंड करण्याचीही तरतूद असल्याचा उल्लेख यात आहे.

रेल्वे गाड्यांसह रेल्वेच्या परिसरात सर्वांनी मुखपट्टी किंवा मुख आच्छादन वापरतील हे निश्चित करण्यासाठी, रेल्वे अधिकाऱ्यांकरवी ५०० रुपयांपर्यंत दंड करण्याची दंडविषयक नियमावलीत करण्यात आली आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 12:02 am

Web Title: corona virus infection covid 19 corona vaccination akp 94
Next Stories
1 करोना रुग्ण आणि नातेवाईकांना दिलासा; रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमतीत घट
2 पंतप्रधान मोदींची आज रात्री ८ वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक
3 “गैर भाजपा शासित राज्यांवर केंद्राचा अन्याय”; सोनिया गांधींची घणाघाती टीका
Just Now!
X