कोची : माझ्या मातृभूमीसाठी लढा देणे मी सुरूच ठेवीन आणि माझा आवाज आहे त्याहून मोठा होईल, असे लक्षद्वीप पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलेल्या चित्रपट निर्मात्या आयशा सुलताना यांनी शुक्रवारी सांगितले.
दूरचित्रवाहिनीवरील एका चर्चेत सुलताना यांनी लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात करोनाच्या फैलावाबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. यासंबंधी भाजपचे लक्षद्वीप शाखेचे अध्यक्ष अब्दुल खादेर यांनी तक्रार केली होती. तिच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी सुलताना यांच्यावर देशद्रोहाचागुन्हा दाखल केला होता.
‘मी मातृभूमीसाठी माझा आवाज यासाठी उठवला नाही, की लोक मला दुर्बल करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा मी माझी ताकद गमावेन. यापुढे माझा आवाज आणखी मोठा होईल’, असे आयशा यांनी फेसबुकवर लिहिले.
ही तक्रार नोंदवणारे भाजप नेते लक्षद्वीपचेच आहेत. त्यांनी स्वत:च्या मातृभूमीची फसवणूक केली असली, तरी मी तिच्यासाठी लढा देणे सुरूच ठेवेल, असेही त्यांनी म्हटले आहे.