करोना विषाणू जगभरात इतक्या वेगानं पसरतो आहे की, मोठ्या उपाययोजनांनंतरही अनेक देशांमध्ये या समोरील आव्हानं वाढतंच आहेत. या सर्व देशांच्या दोन महिन्यांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष निघत आहे की, या वैश्विक महामारीत एकचा पर्याय आहे तो म्हणजे सोशल डिस्टंसिंग, असे कळकळीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना केले आहे.

मोदी म्हणाले, करोना या वैश्विक महामारीबाबत आपण सर्व माध्यमातून ऐकत आहात. जगातील सक्षम देशांनाही या महामारीनं हतबल केलं आहे. अस नाही की हे देश पुरेसे प्रयत्न करीत आहेत की त्यांच्याकडे स्त्रोतांची कमी आहे. मात्र, करोना इतक्या वेगानं पसरतो आहे की मोठ्या तयारीनंतरही या देशांसमोर आव्हान वाढतच आहे. या सर्व देशांच्या दोन महिन्यांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष निघत आहे की, या वैश्विक महामारीत एकचा पर्याय आहे तो म्हणजे सोशल डिस्टंसिंग. सोशल डिस्टंसिंग हे छोट्याशा गावापासून सर्वांनीच अंगिकारायचं आहे.

या संकटापासून वाचायचं असेल तर याची साखळी तोडायला हवी. काही लोकांना असं वाटतंय की हे केवळ आजारी लोकांसाठीच गरजेचं आहे. मात्र, हे सर्व नागरिकांना, प्रत्येक कुटुंबाला त्यातील प्रत्येक सदस्यासाठी इतकेच नव्हे पंतप्रधानासाठी देखील आवश्यक आहे. काही लोकांच्या चुकीच्या विचारामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी याचा मोठा धोका आहे. जर असाच बेजबाबदारपणा सुरु राहिला तर तर भारताला याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते. याचा अंदाजही लावणे कठीण होईल, अशा शब्दांत मोदींनी जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे.