News Flash

चिंताजनक! भारतात गेल्या २४ तासात अमेरिकेपेक्षाही जास्त मृत्यूंची नोंद

भारतात गेल्या २४ तासात ४२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद

संग्रहित

भारतात गेल्या २४ तासात ४२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारतातील दिवसातील मृत रुग्णांची संख्या करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेपेक्षाही जास्त आहे. २९ लाख करोनाबाधित रुग्ण असणाऱ्या अमेरिकेत गेल्या २४ तासात २७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. फक्त ब्राझिलमध्ये भारतापेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे. ब्राझिलमध्ये ६०२ जणांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत भारतात १९ हजार ६९३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आङे. दुसरीकडे अमेरिकेत १ लाख २९ हजार ९४७ मृत्यूंची नोंद झाली असून ब्राझिलमध्ये ही संख्या ६४ हजार ८६७ आहे. एका आठवड्यापूर्वी ३ टक्के आणि दोन आठवड्यांपूर्वी ३.२ टक्के असणारा भारतातील मृत्यूदर २.८ वर पोहोचला आहे. अमेरिका आणि ब्राझिलशी तुलना करता तेथील मृत्यूदर अनुक्रमे ४.५ आणि ४.१ टक्के आहे. जागतिक मृत्यूदर ४.७ टक्के आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर अमेरिका, ब्राझिल आणि भारत आहे.

देशातील रुग्णसंख्या सात लाखांवर
देशातील एकूण रुग्णसंख्या सात लाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत २४ हजार २४८ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ६ लाख ९७ हजार ४१३ झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी म्हटले होते. मात्र, सायंकाळपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे देशातील रुग्णसंख्येने सात लाखांचा टप्पा पार केल्याचे स्पष्ट झाले.

देशात पाच दिवसांमध्ये १ लाख रुग्ण वाढले असून सलग तीन दिवस प्रतिदिन २० हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली आहे. करोनासाठी झालेल्या चाचण्यांमध्ये करोनाबाधित नमुन्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६.७३ टक्के आहे. दिल्लीमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. पण, करोनाबाधित रुग्णांचे सरासरी प्रमाण कमी होऊ लागले असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीत प्रतिदिन १८ हजार चाचण्या घेतल्या जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 7:29 am

Web Title: coronavirus 425 deaths reported in 24 hours in india more than us sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 देशातील रुग्णसंख्या सात लाखांवर
2 चीनची सैन्यमाघार
3 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा
Just Now!
X