News Flash

धक्कादायक! इटलीत करोनाचा कहर, एकाच दिवसात ४७५ जणांचा मृत्यू

एका दिवसात इतक्या मोठय़ा प्रमाणात बळी गेल्याची ही जगातील पहिली घटना आहे

(Image: AP)

चीननंतर इटलीला करोनाचा सर्वात जास्त फटका बसला असून बुधवारी एकाच दिवसात ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोणत्याही देशात करोनामुळे एका दिवसात इतके बळी गेल्याची जगातील ही पहिली घटना आहे. दुर्दैवाने याआधीही एका दिवसात सर्वात जास्त बळी गेल्याची घटनाही इटलीतच घडली होती. त्यावेळी एका दिवसात ३६८ जणांचा मृत्यू झाला होता.

चीननंतर करोनाचा सर्वात जास्त कहर इटलीत झाला आहे. करोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीत इटली चीनच्या जवळ पोहोचला आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, इटलीत मृत्यूमुखीत पडलेल्यांची संख्या २९७८ झाली आहे तर लागण झालेल्यांची संख्या ३५१७३ आहे. यामधील २२५७ जणांची प्रकृती गंभीर आहे. इटलीत उपचारानंतर ४२०५ जणांची प्रकृती सुधारली आहे. दुसरीकडे चीनबद्दल बोलायचं गेल्यास करोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. चीनमध्ये ८० हजार ८९४ जणांना करोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा ३२३७ वर पोहोचला आहे.

इटलीत लॉकडाऊन करण्यात आलेलं असून लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून तीन फुटांचं अंतर ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालयं, रेस्तराँ, चित्रपटगृहे बंद करण्यात आलेली असून लोकांना घरातच थांबवण्यास सांगण्यात आलेलं आहे. इटलीत लाखो लोक आपल्या घरातच थांबलेली आहेत.

जेगभरात करोना मृतांची संख्या आता ८०९२ झाली असून त्यात युरोपात ३४२२ तर आशियात ३३८४ जण मरण पावले आहेत. जगात एकूण २ लाख ६८० लोकांना संसर्ग झाला आहे. आशियातील मृतांच्या संख्येपेक्षा युरोपातील मृतांची संख्या अल्पावधीतच जास्त झाली आहे. २४ तासांत ६८४ जणांचा मृत्यू झाल्याने युरोपातील संख्या वाढली. युरोपात एकूण ७८,७६६ जणांना संसर्ग झालेला आहे.

स्पेनमध्ये मृतांची संख्या ६०० झाली असून संसर्ग झालेल्यांची संख्या १३,७०० झाली आहे. २४ तासांत १०७ जणांचे मृत्यू होऊन एकूण आकडा ५९८ झाला. माद्रिद शहर बंद असून तेथे ५,६३७ जणांना लागण झाली आहे. तेथे तपासणी संचांची कमतरता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 9:13 am

Web Title: coronavirus 475 people died in one day in italy sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: फेसबुकची मोठी घोषणा; घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि अतिरिक्त निधी
2 Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार
3 CoronaVirus : ‘करोना’ला थोपवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय