News Flash

मग्रुरीचा कळस: गाडी थांबवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाच नेलं फरफटत

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे

प्रातिनिधिक फोटो (Photo| IANS)

पंजाबातील जालंधर शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका तपासणी चौकीवर पोलिसांनी गाडीतून जाणाऱ्या व्यक्तीची चौकशी तपासणी करण्यासाठी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता या व्यक्तीने थेट पोलिसांच्या अंगावरच गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. तपासणी चौकी आल्यानंतर गाडीचा वेग कमी करण्याऐवजी तो वाढवत चालक एक पोलीस अधिकाऱ्याला काही फुटांपर्यंत आपल्या गाडीच्या बोनेटवर घेऊन गेला. इतर पोलिसांनी पाठलाग करुन ही गाडी थांबवली आणि पोलीस अधिकाऱ्याची सुटका केली. यासंदर्भातील व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे.

‘जालंधर शहरामध्ये एक कार चालक पोलीस अधिकाऱ्याला आपल्या गाडीच्या बोनेवट काही अंतर घेऊन गेला. हा पोलीस अधिकारी या व्यक्तीला लॉकडाउनच्या काळात सुरु असणाऱ्या तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न करत होता,’ असं एएनआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी गाडीच्या बोनेटवर असतानाही गाडी वेगाने धावता दिसत आहे. पोलीस अधिकारी गाडी बोनेटला पकडून असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पोलीस अधिकारी गाडीचा पाठलाग करुन तिला थांबवतात आणि नंतर चालकाला ताब्यात घेतात असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

एप्रिल महिन्यामध्ये पतियाळा येथे लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले असता पोलिसाचा हात कापल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पंजाब पोलिसांच्या एका अधिकाऱ्याला अशा प्रकारच्या घटनेच्या प्रसंगाला समोरे जावे लागले. पतियाळामध्ये तपासणी चौकीवर कर्फ्यू पास मागितल्याने तसंच भाजी मंडईत जाण्यापासून रोखल्याने निहंगा समुदायातील काही जणांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हरजीत सिंह यांचा हात तलवारीने कापण्यात आला होता. पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीने कापलेला हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश आल्याचेही वृत्त नंतर समोर आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 11:52 am

Web Title: coronavirus a car driver drags a police officer on cars bonnet in jalandhar scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनाची दहशत! रस्त्यावर पडलेल्या २५ हजार रुपयांना कोणीच हात लावेना
2 Lockdown : गोव्यातील बिअर शॉपधारकांना स्टॉक संपण्याची भीती
3 उत्तर प्रदेशात सामूहिक हत्याकांड : आरोपीने संपत्तीच्या वादातून आई-वडिलांसह भावाच्या परिवाराला संपवलं
Just Now!
X