News Flash

करोना होऊन गेला का? आता ‘या’ चाचणीतून कळणार

चाचण्यांचे निष्कर्ष ९९.९ टक्के अचूक

करोनामुळे प्रत्येकाचं दैनंदिन आयुष्य बदलून गेलं आहे. करोनाच्या भीतीपोटी अनेकजण गर्दीत जाण्याचं टाळत आहे. तर अनेकजण असे आहेत, ज्यांना करोनाचा संसर्ग होऊन ते बरेही झाले. आता करोना होऊन गेला का? याची खातरजमा करण्यासाठी एका चाचणीतून करता येणार आहे. “आयजी-जी सीएलआयए अँटिबॉडी चाचण्यांच्या माध्यमातून हे माहिती करून घेता येणार आहे. आयजी-जी अँटिबॉडीच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा आधारित रक्त चाचणी साहित्याचा पुरवठा सुरू केल्याचे अॅबॉटने आज जाहीर केले आहे. या चाचणीची १ दशलक्ष किट्स भारतात पुरवण्याची  क्षमता असल्याचा विश्वास अॅबॉटनं व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, जम्मू-कश्मीर व गुजरातमधील अनेक आघाडीच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांना अँटिबॉडी चाचण्यांच्या किट्स पुरवण्याची प्रक्रिया कंपनीनं यापूर्वीच सुरू केली आहे.

आयजी-जी सीएलआयए अँटिबॉडी चाचण्यांच्या माध्यमातून करोना अँटिबॉडी तपासण्याच्या आयसीएमआरच्या धोरणाला हातभार लावण्याचा प्रयत्न अॅबॉटकडून केला जात आहे. यासंदर्भात अॅबॉटने नुकतेच बाजारात आणलेले सार्स-सीओव्ही-२ आयजी-जी चाचणी किट आरोग्यसेवा कर्मचारी, रोगप्रतिकारशक्ती दुबळी असलेल्या व्यक्ती, फ्रण्टलाइन कर्मचारी किंवा करोना प्रभावित क्षेत्रातील नागरिक यांसारख्या धोक्यातील लोकसंख्येमधील संक्रमणाचा प्रसार समजून घेण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. लक्षणे दिसून लागल्यानंतर १७ दिवसांनी किंवा त्याहून अधिक काळाने ही चाचणी केलेल्या रुग्णांमध्ये या चाचण्यांचे निष्कर्ष ९९.९ टक्के अचूक व १०० टक्के संवेदनशीलतेसह आले, असा स्वतंत्र संशोधकांचा निष्कर्ष आहे. या चाचण्यांमुळे सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लक्षण नसलेल्या रुग्णांमधील प्रसाराविषयीची माहिती कळते. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं केलेल्या उपायांच्या प्रभावाचे मूल्यमापन करण्यातही मदत करतात आणि एकंदर करोना परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद दिला पाहिजे, यावर मदत करतात,” असे अॅबॉटच्या भारतातील डायग्नोस्टिक्स व्यवसायाचे महाव्यवस्थापक व भारतातील प्रमुख नरेंद्र वर्दे यांनी सांगितले.

भारतात या चाचणीचे मूल्यमापन करणाऱ्या पहिल्या काही रुग्णालयांमध्ये मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचा समावेश करण्यात आलेला आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्राच्या प्रयोगशाळा संशोधन विभागाच्या संचालक तसेच चीफ ऑफ लॅब्ज (प्रशासन) डॉ. टेस्टर एफ. आशा वैद म्हणाल्या, “करोनासाठी आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांसाठी आम्ही केलेल्या या चाचण्यांचे सुरूवातीचे निदान अचूक ठरले आहे. ही चाचणी क्लिनिशियन्स व समुदायांसाठी उपयुक्त आहे.”

मुंबईतील कस्तुरबा गांधी संसर्गजन्य विकार रुग्णालयातील मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. जयंती शास्त्री म्हणाल्या, “मुंबईसारख्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचा या विषाणूशी कोणत्या स्तरापर्यंत संपर्क आला याचे मूल्यमापन महत्त्वाचे आहे. अधिकारी यंत्रणांना प्रसार रोखण्याच्या फेरमूल्यमापन धोरणांबाबत मार्गदर्शन देऊन ते प्रभागवार केले जाऊ शकते. फ्रण्टलाइन आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसारख्या धोक्याच्या क्षेत्रातील लोकसंख्येसाठी ही चाचणी विशेष महत्त्वाची आहे. यांच्या चाचण्यांच्या निष्कर्षांमधून आम्हाला करोनाची संसर्गजन्यता समजून घेणे शक्य होणार आहे.”

“अॅबॉटची सार्स-सीओव्ही-२ आयजी-जी चाचणी प्रामुख्यानं आयजी-जी अँटिबॉडींचे निदान करते. आयजी-जी हे एक प्रथिन असून, संसर्गाच्या नंतरच्या टप्प्यांमध्ये शरीर हे प्रथिन तयार करते. रुग्ण कोविड-१९ आजारातून बरा झाल्यानंतर काही महिने किंवा अगदी वर्षापर्यंतही हे प्रथिन त्याच्या शरीरात राहू शकते. ही चाचणी ARCHITECT®️ i1000SR आणि i2000SR या प्रयोगशाळा उपकरणांवर करण्यात आली. ही उपकरणे भारतभरातील रुग्णालये व प्रयोगशाळांमध्ये आहेत. त्यावर तासाभरात १००-२०० चाचण्या केल्या जाऊ शकतात. त्यामुळे साथीच्या काळात अँटिबॉडी चाचण्या खात्रीशीर मार्गाने होऊ शकतो, असं अॅबॉटनं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 6:44 pm

Web Title: coronavirus abbott introduces antibody test kits in india bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रामदेव बाबांच्या करोनिल औषधाची किंमत किती? सर्वसामान्यांना विकत मिळेल का?
2 करोना संकट वाढल्याने ‘या’ देशाने केलं लष्कराला पाचारण
3 लॉकडाउनमुळे दुकान बंद पडल्याने झाला मानसिक परिणाम; तासनतास मूर्तीप्रमाणे एकाच जागी राहतो उभा
Just Now!
X