करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात दिवसागणिक वाढतच चालाला आहे. एक एप्रिलपासून २३ एप्रिलपर्यंत करोनाग्रस्तांच्या संख्येत सहा पटीनं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दररोज करोनाग्रस्तांच्या संख्येत होणारी वाढ देशासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. करोनावर मात करण्यासाठी भारतामध्ये जवळपास महिनाभरापासून लॉकडाउन घेण्यात आला आहे. तरीही करोनाग्रस्तांच्या संख्येत कमी झालेली दिसून येत नाही.

महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि राज्यस्थानसारख्या मोछ्या राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. करोनानं भारतात शिरकाव केल्यानंतर सर्वाधिक रूग्ण असलेल्या केरळ राज्यानं देशांसमोर आदर्श ठेवला आहे. गुरूवारी केरळमध्ये फक्त१० रूग्ण आढळले तर महाराष्ट्रात ७७८ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. पोलिस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आणि पत्रकारांनाही करोनानं ग्रासलं आहे. एप्रिलच्या महिन्यात करोना ग्रस्तांच्या संख्येत देशात झालेली वाढ पाहा….ही वाढ पाहून तुम्ही थक्क व्हाल…

महाराष्ट्रात गुरुवारी करोनाचे ७७८ नवे रुग्ण सापडले असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. यासोबत राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या सहा हजारावर पोहोचली आहे. राज्यात सध्या ६४२७ करोनाबाधित रुग्ण आहेत. तर मृत्यू झालेल्यांची संख्या २८३ आहे.  पाहा देशातील दहा राज्यातील करोनाची स्थिती….

आघाडीची १० राज्यएकूण करोनाबाधितांची संख्या गुरूवारी आढळलेले नवीन करोना बाधितकरोनाबाधित मृत्यू
महाराष्ट्र६४२७७७८२८४
गुजराज२६२४२१७११२
दिल्ली२३७६१२८५०
राजस्थान१९०१७६२८
मध्य प्रदेश१६८७१००८३
तामिळनाडू१६८३५४१९
उत्तर प्रदेश१५१०६१२१
तेलंगाना९७०२७२६
आंद्र प्रदेश८९३८०२३
केरळ४४७१०

देशांत दररोज करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरूवारी देशातील करोनाग्रस्तांची संख्या २२ हजारांकडे गेली आहे. मुंबई,पुणे आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरात करोनाच्या संख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय आहे..