03 June 2020

News Flash

कोणी ‘करोना’ घ्या कोणी ‘कोविड’ घ्या; लॉकडाउनदरम्यान जन्माला आलेल्या जुळ्यांचं अनोखं बारसं

मुलाचं नाव कोविड ठेवण्यात आलं आहे तर त्याच्या बहिणीचं नाव करोना ठेवण्यात आलं आहे.

प्रातिनिधिक फोटो

छत्तीसगडमधील रायपूर येथील एका रुग्णालयामध्ये जन्मलेल्या जुळ्या भाऊ-बहिणींची नावं करोना आणि कोवीड अशी ठेवण्यात आली आहे. २६ आणि २७ मार्चच्या मध्यरात्री या दोघांचा जन्म झाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी देशभरामध्ये २४ मार्चपासून २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. याच कालावधीमध्ये दोघांचा जन्म झाल्याने त्यांची नावं करोना आणि कोवीड ठेवण्यात आली आहेत.

मुलांची नावं एका विषाणूच्या नावावरुन का ठेवण्यात आली आहेत असा प्रश्न पालकांना विचारला असता त्यांनी, ‘कशाप्रकारे कठीण परिस्थितीवर मात करुन या मुलांचा जन्म झाला आहे हे त्यांच्या कायम स्मरणात रहावे म्हणून आम्ही त्यांची नावं अशी ठेवली आहे. देश एकत्र येऊन करोनाविरुद्ध लढत असतानाच त्यांचा जन्म झाला आहे,’ असं मत नोंदवलं.  पीटीआय या वृत्तसंस्थे शी बोलताना या मुलांच्या आईने रुग्णालयामधील नर्सनेच या मुलांचे नामकरण केल्याचं सांगितलं. “रुग्णालयामधील कर्मचारी आणि नर्सच मुलांना करोना आणि कोविड नावाने हाक मारु लागले. त्यावेळीच आम्ही मुलांची नावं ठरवली,” असं या मुलांची आई म्हणाली. भविष्यात आम्ही मुलांची नाव बदलू असंही या महिलेने स्पष्ट केलं आहे. मुलाचं नाव कोविड ठेवण्यात आलं आहे तर मुलीचं नाव करोना ठेवण्यात आलं आहे.

देश करोनाशी दोन हात करत असताना, देशातील करोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच अशा चिंताजनक परिस्थितीमध्ये या मुलांचा जन्म झाला हे आम्हाला आयुष्यभर लक्षात राहण्यासाठी अशी वेगळी नावं ठेवण्यात आल्याचं पालकांनी सांगितलं. रुग्णालयामधील नवजात बालकांची नाव करोना आणि कोविड ठेवण्यात आल्याचे समजल्यानंतर रुग्णालयामध्ये हे भाऊ-बहीण चर्चेचा विषय ठरले. या तिघांना रुग्णालयामधून घरी पाठवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 3:11 pm

Web Title: coronavirus amid virus pandemic india welcomes twin babies corona and covid scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 धोक्याचा इशारा : देशाचा विकासदर येईल ४ टक्क्यांवर
2 पंतप्रधान मोदींचे भाषण आणि ‘९’ अंकाचं कनेक्शन
3 “नमाजच्या नावाखाली सोशल डिस्टन्सिंग न पाळणं हराम”, जमात-उलेमा-ए-हिंदच्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य
Just Now!
X