28 May 2020

News Flash

Coronavirus: “तुम्ही फक्त गोमूत्र प्या आणि थाळ्या वाजवा”

बरेलीमधील फवारणीच्या व्हिडिओवरील भाजपा नेत्याच्या वक्तव्यानंतर लगावला टोला

अनुराग कश्यम आणि अमित मालवीय

चित्रपट निर्माता, दिग्दर्शक असणारा अनुराग कश्यप सोशल मिडियावर प्रंचड अक्टीव्ह आहे. अनेकदा तो सामाजिक आणि राजकीय मुद्द्यावर सोशल मिडियावर मुक्तपणे आपली मते मांडतो. अनुरागने याआधी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आता अनुरागने थेट भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही गोमूत्र प्या आणि थाळ्या वाजवा असा खोचक सल्ला मालवीय यांच्या एका ट्विटवर अनुरागने दिला आहे.

झालं असं की सोमवारी म्हणजेच ३० एप्रिल रोजी उत्तर प्रदेशमधील बरेली येथील एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. यामध्ये दिल्ली, हरियाणा, नोएडा येथून आलेल्या शेकडो कामगार, महिला आणि लहान मुलांना जमीनीवर बसवून त्यांवर सिटायझर सोल्युशन फवारण्यात आलं. या व्हिडिओवरुन बराच वाद झाला. अनेकांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर टीका केली.

भाजपाची सत्ता असणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारवर टीका करण्यात आल्यानंतर मालवीय यांनी एक दुसरा व्हिडिओ ट्विट केला. “हा केरळचा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये दुसऱ्या राज्यातून आलेल्य लोकांवर फवारणी केली जात असल्याचे दिसत आहे. मात्र लोकांना उत्तर प्रदेशमधील घटनेचा राग येत आहे, का तर तेथे भगवाधारी संत राज्यातील लोकांचं भलं करण्यासाठी काम करत आहे,” असं कॅप्शन या व्हिडिओला मालवीय यांनी दिली आहे.

मालवीय यांच्या या ट्विटवरुन अनुरागने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अनुरागने मालवीय यांना दिलेल्या उत्तरमध्ये, “हा बघा परत आला खोटं बोलणाऱ्यांचा मोहरक्या. या व्हिडिओतील फवारणी आणि बरेलीमधील फवारणीमध्ये बरेच अंतर आहे. तुमच्या गोबर बुद्धीला हा फरक कळणार नाही. तुम्ही गोमूत्र प्या आणि थाळ्या वाजवा,” असा टोला लगावला आहे.

त्यानंतर अनुरागने आणखीन एक ट्विट करत दोन्ही प्रकारच्या फवारणीमध्ये काय फरक आहे हे सांगितलं. बरेलीमध्ये लोकांवर फवारण्यात आलेल्या सॅनिटायझर सोल्युशनमध्ये मानवी शरिराला घातक ठरणारं सोडियम हायपोक्लोराइट होतं. केरळमध्ये कऱण्यात आलेल्या फवारणीमध्ये मानवी शरीर स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणार कॅल्शियम हायपोक्लोराइट होतं, असा दावा अनुरागने केला आहे.

बरेलीच्या सीमेवर कामगारांवर करण्यात आलेल्या फवारणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश प्रशासनाने आपली चूक कबुल केली आहे. जिल्हाधिकारी नितीश कुमार यांनी या कामगारांना उघड्यावर अंघोळ करण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. “बरेलीमधील अती उत्साही महानगपालिका आणि अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांना बस सॅनिटाइज कऱण्यास सांगण्यात आलं होतं. तर त्यांनी लोकांवरच फवारणी केली,” असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 12:40 pm

Web Title: coronavirus anurag kashyap troll bjp amit malviya over bareilly spray issue scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 Cronavirus: “काही लोक मरणारच, पण त्यासाठी अर्थव्यवस्थेची वाट लावू शकत नाही”
2 ‘भारत करोनाविरुद्धचे युद्ध आरामात जिंकणार’; पद्म पुरस्कार विजेत्या डॉक्टराने सांगितली दोन महत्वाची कारणं
3 दिल्ली हादरली; एकाच इमारतीतील २४ जणांना करोनाचा संसर्ग
Just Now!
X