News Flash

Coronavirus: इटलीमध्ये २५ हजारहून अधिक दगावले; तरी ‘या’ कारणामुळे लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार सुरु

सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत इटली दुसऱ्या स्थानी

Coronavirus: इटलीमध्ये २५ हजारहून अधिक दगावले; तरी ‘या’ कारणामुळे लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार सुरु
संग्रहित छायाचित्र

अमेरिकेबरोबरच युरोपीयन देशांनामध्ये करोनाचा मोठा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यातही इटली, स्पेनसारख्या देशांना करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीने २५ हजारांचा टप्पा ओलांडला. मात्र बुधवारी उपचार घेऊन बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या २ हजार ९०० हून अधिक आहे. त्यामुळेच उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी कमी झाल्याने इटलीला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दिवसोंदिवस उपचार घेत असणाऱ्यांची संख्या कमी होत असून अनेकजणांना डिस्चार्ज देण्यात येत असल्याने लॉकडाउनसंदर्भातील नियम शिथिल करण्याचा विचार सुरु असल्याचे, एएफपीने या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

मागील २४ तासांमध्ये इटलीत करोनामुळे ४३७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यामध्ये इटलीत करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २५ हजार ८५ वर पोहचला आहे. करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीमध्ये इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेमध्ये करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. करोनामुळे अमेरिकेत गुरुवार सकाळपर्यंत (भारतीय वेळेनुसार) ४७ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी इटलीतील मरण पावलेल्यांचा आकडा २५ हजाराहून अधिक झाल्याचे सांगितले असले तरी येथील डॉक्टरांनी हा आकडा अधिक असल्याचे शक्यता व्यक्त केली आहे. घरीच मरण पावलेले आणि रुग्णालयामध्ये दाखल न केलेल्या मृतांची आकडेवारी सरकारी आकडेवारीत गृहित धरण्यात आलेली नसल्याने हा आकडा अधिक असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

इटलीमध्ये ३ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. सध्याच्या करोनासंदर्भातील आकडेवारीवर सरकार नजर ठेऊन आहे. या आकडेवारीच्या आधारावर लॉकडाउनसंदर्भातील पुढील निर्णय घेतला जाणार आहे. हा आठवडा संपण्याआधी इटली करोनाविरुद्धच्या संकटाला कशापद्धतीने तोंड देणार आहे यासंदर्भातील घोषणा आपण करणार असल्याचे आश्वासन इटलीचे पंतप्रधान गिसीपी काँटे यांनी दिलं आहे.

जगभरातील देशामध्ये लॉकडाउनचा कालावधी सुरु असला तरी इटलीमधील लॉकडाउनहा सर्वात मोठा लॉकडाउन आहे. येथे ९ मार्चपासून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. देशातील करोनाग्रस्तांची संख्या लक्षात वेळेवेळी या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. इटलीप्रमाणेच इतर युरोपीयन देशांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. १२ मार्चपासून देशातील मेडिकल आणि किराणा मालाची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 10:48 am

Web Title: coronavirus as govt considers easing lockdown italys coronavirus death toll tops 25000 scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राष्ट्रपतींकडून अध्यादेशावर शिक्कामोर्तब; वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं पडणार महागात
2 “करोनापेक्षाही मोठं संकट भविष्यात येण्याची शक्यता”
3 Coronavirus : देशभरात 21 हजार 393 पॉझिटिव्ह रुग्ण
Just Now!
X