News Flash

करोना संकट वाढल्याने ‘या’ देशाने केलं लष्कराला पाचारण

करोना वाढल्यानं घेतली लष्कराची मदत

संग्रहित (AP/Ted S. Warren)

एकीकडे जगात करोनाने थैमान घातला असता काही देशांनी मात्र त्यावर नियंत्रण मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाही करोनाचा फैलाव रोखण्यात यशस्वी ठरलं आहे. यामुळेच करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सर्व काळजी घेतली जात आहे. व्हिक्टोरिया शहरात करोनाचा संकट गहिरं झालं असल्याने लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. राज्यात लष्कराची कुठे मदत घेतली जावी यासाठी व्हिक्टोरियामधील आरोग्य अधिकारी संरक्षण अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करणार आहेत. जवळपास एक हजार लष्करी जवान मेलबर्नमधील क्वारंटाइन हॉटेल्सवर लक्ष ठेणार असून परिस्थिती गंभीर झाल्यास मदतीसाठी तयार असणार आहेत. सिडनी मॉर्निंग हेराल्डने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

बुधवारी व्हिक्टोरियामध्येय सलग १८ व्या दिवशी दोन अंकी करोनाबाधित रुग्ण आढळल्याने लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशाचे संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड्स यांनी करोनाच्या संकटात सैन्यांच्या तुकड्या व्हिक्टोरियाला मदत करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. व्हिक्टोरियामध्ये अतिरिक्त मदतीची गरज लागली तर तयारीत राहा असे निर्देश आपण दिले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सरकारने करोना संकटाचा सामना करण्यासाठी लष्कराच्या मदतीचा प्रस्ताव ठेवला होता. याशिवाय इतर चार राज्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या मदतीची ऑफर दिलेली आहे”. मदतीमुळे आम्ही जास्तीत जास्त टेस्ट करुन लवकर रिपोर्ट मिळवू शकतो असा विश्वास व्हिक्टोरिया सरकारने व्यक्त केला आहे.

व्हिक्टोरियात एका मृत्यूची नोंद झाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. एका ८० वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला असून समूह संसर्गाची भीती व्यक्त होत आहे. जागतिक पातळीवर ऑस्ट्रेलिया करोनावर नियंत्रण मिळवणाऱ्या देशांच्या यादीत आहे. ऑस्ट्रेलियात करोनाचे आतापर्यंत ७५०० रुग्ण सापडले असून १०३ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ऑस्ट्रेलियामधील अनेक ठिकाण करोना-फ्री जाहीर करण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 6:35 pm

Web Title: coronavirus australia deploys military in melbourne sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लॉकडाउनमुळे दुकान बंद पडल्याने झाला मानसिक परिणाम; तासनतास मूर्तीप्रमाणे एकाच जागी राहतो उभा
2 “त्यांच्या लायसन्सच्या अर्जावर करोनाचा उल्लेखही नव्हता; पतंजलीला औषधाबद्दल नोटीस देणार”
3 बायको शाकाहारी, नवरा मांसाहारी; मटण बनवण्यावरुन भांडण झालं आणि मग घडायला नको ते…
Just Now!
X