करोना व्हायरस महामारीने जगभरात ६० हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ लाखांपेक्षा जास्त नागरिक करोना व्हायरसच्या चपाट्यात आले आहेत. दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे जगभरातील लोकांमध्ये चिंतेचे आणि भितीचे वातावरण आहे. करोना व्हायरसवर लस किंवा औषध शोधण्यासाठी जगातील प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. अशांतच ऑस्ट्रेलियामधील संशोधकांनी करोना व्हायरसवर औषध मिळाल्याचा दावा केला आहे. अवघ्या ४८ तासांत खात्मा केला जाईल असंही आपल्या दाव्यात त्यांनी म्हटलेय.

करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एका पेशीच ४८ तासांत खात्मा केल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी केला आहे. त्यांनी यासाठी अॅण्टी-पॅरासाइट या आधीच्याच औषधांचा वापर केला आहे. करोना महामारी संपवण्यासाठी हे मोठं पाऊल असल्याचं तज्ञ्जांचं मत आहे. लवकरच याची क्लिनिकल ट्रायल सुरू होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठाच्या काइली वॅगस्टाफ यांनी इतर वैज्ञानिक सहकाऱ्यांसोबत हे संशोधन केले आहे.

इवरनेक्टिन नावाच्या औषधाच्या फक्त एक डोस करोनाच्या विषाणूसह इतर सर्व आरएनए व्हायरसचा अवघ्या ४८ तासांमध्ये खात्मा करू शकतो. इवरनेक्टिनच्या एका डोसमुळे जर विषाणूचा संसर्ग कमी झाला तर व्हायरस २४ तासांतही करोनाचा खात्मा होऊ शकतो, असे अॅण्टी-व्हायरस रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.  ‘पूर्वीच उपलब्ध असलेल्या औषधाचा वापर करण्यात आला आहे. इवरनेक्टिन हे एचआयव्ही, डेंग्यू, इन्फ्लुएन्झा, जीका व्हायरस सारख्या विविध व्हायरसवर प्रभावी ठरले आहे. करोना व्हायसरविरोधात वापरासाठी या औषधांची क्लिनिकल ट्रायल करण्याची आवश्यकता असल्याचे काइली वॅगस्टाफ यांनी सांगितले.’