News Flash

चिंतेची बाब : भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या १२ हजारांच्या पुढे, मृत्यूचा आकडा ४१४ वर

मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, जयपूर आणि आग्रासारख्या प्रमुख शहरात करोना व्हायरसचे हॉटस्पॉट आहेत.

संग्रहित छायाचित्र

करोना व्हायरस महामारीमुळे भारतामध्ये आतापर्यंत ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर करोना बाधितांची संख्या १२, ३८० झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे भारतामध्ये चिंतेचे वातावरण आहे. यापैकी १४८९ रुग्णांना घरी पाठवण्यात आलं आहे. तर १० हजार ४४७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. देशभरात लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही घोषणा केली. लॉकडाउनचे नियम आणखी कठोर होणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. भारतामध्ये १२३ जिल्ह्यात १७० करोना व्हायरसचे हॉटस्पॉट आहेत. दिल्ली-मुंबईमध्ये सर्वाधित चिंतेचे वातावरण आहे.

मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, जयपूर आणि आग्रासारख्या प्रमुख शहरात करोना व्हायरसचे हॉटस्पॉट आहेत. या शहरामध्ये करोनाबाधिंताची संख्या जास्त आहे. या सर्व भागांना रेड झोन म्हणून घोषीत करण्यात आले असून येथे १०० टक्के लॉकटाउन पाळण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रमुख शहरामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. ज्या ठिकाणी करोनाचा शिरकाव झालेला नाही तिथे काही गोष्टी शिथील केल्या जातील मात्र लॉकडाउन कायम असेल असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

देशातील ४०० जिल्हे करोनामुक्त –
भारतातील ४०० जिल्ह्यांमध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला नाही. या जिल्ह्यामध्ये एकही करोनाबाधित रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे सरकार या जिल्ह्यांना करोनामुक्त कायम ठेवण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करत आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांचा तपास करण्यात आम्हाला यश आलं आहे. तसंच पुढचे २-३ आठवडे हे देशासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं.

दरम्यान, जगभरात करोनाची २० लाख १५ हजार ५७१ जणांना लागण झाली असून आतापर्यंत एक लाख २७ हजार ६३५ जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ युरोपमध्ये १० लाख तीन हजार २८४ जणांना लागण झाली असून ८४ हजार ४६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 9:21 am

Web Title: coronavirus cases in india cross 12000 mark 414 deaths nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “मोदीजी, राज्यांना नुसतं कौतुक नको करोनाविरुद्ध लढण्यासाठी आर्थिक मदतही द्या”
2 दुर्दैवी! पोट भरण्यासाठी मजुरांवर स्मशानाबाहेर कचऱ्यात फेकलेली केळी खाण्याची वेळ
3 Coronavirus Live Updates: ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’बाबत भारताचा मोठा निर्णय
Just Now!
X