News Flash

करोना व्हायसरचा फैलाव केल्याच्या आरोपांवर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी केलं भाष्य, म्हणाले…

शी जिनपिंग यांच्या हस्ते करोना संकटात उत्तम कामगिरी करणाऱ्या रोल मॉडेल्सचा सत्कार

संग्रहित (Photo Courtesy: Reuters)

जगभरावर असलेलं करोनाचं संकट अद्यापही टळलेलं नसून लस मिळवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. करोनामुळे जगभरातील करोडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीमच्या वुहान प्रांतातून करोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली होती. यानंतर चीनवर जाणुनबुजून करोना व्हायरसची माहिती लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर जाहीरपणे हा करोना नसून चिनी व्हायरस असल्याची टीका केली होती. दरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पहिल्यांदाचा या आरोपांवर भाष्य केलं असून प्रतिक्रिया दिली आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी करोनाचा फैलाव होऊ लागल्यानंतर आम्ही अत्यंत पारदर्शकपणे याचा सामना केल्याचं म्हटलं आहे. तसंच आम्ही घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे तसंच प्रयत्नांमुळे जगभरातील करोडो लोकांचा जीव वाचला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

शी जिनपिंग यांच्या हस्ते करोना संकटाचा सामना करताना उत्तम कामगिरी करणाऱ्या रोल मॉडेल्सचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. करोना संकटात पुन्हा एकदा अर्थव्यवस्था रुळावर आणत प्रगती करणाऱ्या देशांमध्ये चीन प्रमुख देश असल्याचं शी जिनपिंग यांना यावेळी सांगितलं. यावरुन आपल्या देशाची क्षमता दिसत असल्याचंही यावेळी ते म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 10:27 am

Web Title: coronavirus china president xi jinping says china acted openly and transparently sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘कंगनाला Y+ सुरक्षा माझ्या करातून मिळणार का?’; अभिनेत्रीचा संतप्त सवाल
2 Coronavirus : काहीसा दिलासा! रुग्णवाढीत घसरण पण, मृतांची संख्या चिंताजनक
3 लॉकडाउननंतर तिरुपती मंदिरात भाविकांकडून पहिल्यांदाच एका दिवसात तब्बल ‘इतकं’ दान !
Just Now!
X