News Flash

वर्क फ्रॉम होमसाठी ३ मे पर्यंत मोफत इंटरनेट?; तो व्हायरल मेसेज खरा की खोटा जाणून घ्या

देशामध्ये ३ मेपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे

देशातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा १४ एप्रिल रोजी केली. २५ मार्च पासून सुरु असणारा लॉकडाउन १४ एप्रिलला संपणार होता. मात्र देशातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा कालावधी वाढवण्यात आला. असं असलं तरी या कालावधीमध्ये सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचे प्रमाण वाढलं आहे.

अशीच एक अफवा मागील काही दिवसांपासून व्हायरल झाली आहे. या व्हायरल मेसेजमध्ये दूरसंचार विभागामार्फत देशातील सर्व मोबाईल युझर्सला ३ मे २०२० म्हणजेच लॉकडाउनचा कालावधी संपेपर्यंत मोफत इंटरनेट देण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. घरुन काम करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचेही या व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे. अनेकजण व्हॉट्सअ‍ॅपवरही हा मेसेज फॉरवर्ड करताना दिसत आहेत.

मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या प्रसार भारतीने हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. बुधवारी (२२ एप्रिल २०२०) प्रसार भारतीने ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केलं असून यासाठी नोंद करण्याची खोटी लिंक व्हायरल होत असल्याचे म्हटलं आहे.

“दूरसंचार विभागामार्फत देशातील सर्व मोबाईल युझर्सला ३ मे २०२० पर्यंत घरुन काम करण्यासाठी मोफत इंटरनेट सेवा पुरवली जात नाहीय. यासंदर्भातील खोटा मेसेज व्हायरल झाला आहे. अमुक एका लिंकवर क्लिक करण्यासंदर्भातील दावा खोटा आहे,” असं ‘पीआयबी फॅक्ट चेक’च्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करण्यात आलं आहे.

लॉकडाउन सुरु झाल्यापासून देशामध्ये इंटरनेटचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. अनेकजण घरुनच काम करत असल्याने इंटरनेटचा वापर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी इंटरनेट कनेक्टीव्हीमध्ये काही अडचण येणार नाही यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 5:00 pm

Web Title: coronavirus covid19 centre giving free internet to all users till may 3 pibs fact check scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: १५ ऑक्टोबरपर्यंत हॉटेल, रेस्तराँ, रिसॉर्ट बंद?; जाणून घ्या त्या व्हायरल मेसेजमागील सत्य काय
2 Coronavirus: चीनवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला, चौकशी करण्याची ऑस्ट्रेलियाची मागणी
3 धक्कादायक! १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, मित्र करत होते व्हिडीओ शूटिंग
Just Now!
X