News Flash

करोनावर मात करुन परतलेल्या नेत्याच्या स्वागताला हजारोंची गर्दी, फटाके फोडून जल्लोष

तामिळनाडूत नेत्याच्या स्वागतासाठी सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन

करोनावर मात करुन घरी परतलेल्या नेत्याच्या स्वागताला हजारोंच्या संख्येने समर्थक आणि लोकांनी गर्दी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला. तामिळनाडूमधील मदुराई येथे हा प्रकार घडला आहे. सहकार मंत्री सेल्लूर राजू करोनावर मात करुन परतल्यानंतर त्यांचं स्वागत करताना अण्णाद्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं उल्लंघन करण्यात आलं.

सेल्लूर राजू यांना करोनाची लागण झाली होती. चेन्नईमधील एमआयओटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. करोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने एकीकडे राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याची घोषणा केली असतानाच अण्णाद्रमुकचे कार्यकर्ते मात्र गर्दी करत नियमांचं उल्लंघन करताना आढळून आले. एएनआयने याचा व्हिडीओही शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये समर्थक फटाके फोडताना, सेल्लूर राजू यांना शुभेच्छा देताना तसंच सेल्फी काढताना दिसत आहेत. मदुराईमध्ये करोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच ही घटना समोर आली आहे.

आणखी वाचा- धक्कादायक! दारु मिळत नसल्याने प्यायले सॅनिटायझर, त्यानंतर घडलं असं काही…

दरम्यान तामिळनाडूत मात्र करोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये दिवसाला सात हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढलल्यानंतर गुरुवारी राज्यात ५६८४ रुग्ण आढळले. राज्यातील सध्याची रुग्णसंख्या २ लाख ३९ हजार ९७८ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ३८३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 12:46 pm

Web Title: coronavirus crowd violates social distancing burst crackers to welcome aiadmk minister sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनाची लागण झालेल्या अमेरिकेतील ‘त्या’ पहिल्या श्वानाचा मृत्यू
2 देशात करोना रुग्णसंख्येत चिंतेत भर टाकणारी वाढ; आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले
3 आता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या; ट्रम्प यांचं करोनामुक्त रुग्णांना आवाहन
Just Now!
X