News Flash

अमेरिकेत करोनाचा हाहाकार सुरुच : बळींच्या संख्येने ओलांडला एक लाखांचा टप्पा

२१३ देशांत ५८ लाख जणांना करोनाचा संसर्ग झाला

अमेरिकेतही मोडर्ना कंपनीने विकसित केलेल्या लसीची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे.

बलाढ्या अमेरिकेत करोनाचा विळखा दिवसागणिक आधिक घट्ट होत चालला आहे. अमेरिकेत आतापर्यंत एक लाखांपेक्षा आधिक जणांचा करोनानं बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत १७ लाख ४५ हजार ८०३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. अमेरिकेसाठी दिलासादायक बाब म्हणजे चार लाख ९० हजार १३० जणांनी करोनावर मात केली आहे.

करोना व्हायरसवर लस तयार करण्यात अपयश आले तर २०२४ पर्यंत ५० ते ५० लाख लोकांना संसर्ग होऊ शकतो तर मृत्यूची संख्या १४ लाखांच्या घरात जाऊ शकते, असा इशारा अमेरिकेतील संशोधकांनी दिला आहे. अमेरिकेत आतापर्यंत एक लाख दोन हजार १०७ जणांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक करोना व्हायरस या महामारीचा फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेतील ५० प्रांतामध्ये लॉकडाउनमध्ये सूट देण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे.

अमेररिकेत सर्वाधिक नुकसान न्यूयॉर्क शहारात झाले आहे. देशातील एकूण २२ टक्के रूग्ण एकट्या न्यूयॉर्क शहरातील आहेत. तीन लाख ७४ हजरा जणांना संसर्ग झाला तर ३० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क शहरात जगातील सर्व मोठ्या कंपन्यांची कार्यलये आहेत. शिवाय अनेक देशांचे दूतावासही येथेच आहे. न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कॅलीफोर्निया, इलिनोअस आणि मॅसाच्युसेट्स या पाच शहरात ५५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरातील २१३ देशात करोना व्हायरस या महामारीने विळखा घातला आहे. जगात आतापर्यंत ५७ लाख ८९ हजार ८४३ जणांना संसर्ग झाला आहे. तर तीन लाख ५७ हजार ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात आतापर्यंत २४ लाख ९७ हजार ६१८ जणांनी करोनावर मात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 8:52 am

Web Title: coronavirus deaths in us top 100000 nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 उपासमारीमुळे महिलेचा रेल्वे स्थानकावरच मृत्यू, बाळाची मात्र आईला उठवण्यासाठी केविलवाणी धडपड
2 उष्णतेची लाट आणखी २४ तास
3 ‘काँग्रेस महाविकास आघाडीच्या पाठीशी’
Just Now!
X