News Flash

“हा देश नेमकं कोण चालवतंय माहिती नाही,” ऑक्सिजनअभावी होणाऱ्या मृत्यूंवरुन डॉक्टरांचा संताप

देशात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा ही समस्या गंभीर होत चालली आहे

प्रातिनिधिक (Reuters)

देशात एकीकडे करोनाचा फैलाव रोखण्याचं आवाहन असताना दुसरीकडे आरोग्य सुविधांचा तुटवडा सर्वात मोठं आव्हान आहे. ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू सध्या सर्वात मोठा चिंतेचा विषय ठरत असून देशभरातून मदतीसाठी आवाहन केलं जात आहे. देशातील ऑक्सिजन संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे. शनिवारी दिल्लीमधील बत्रा रुग्णालयातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर सोमवारी कर्नाटकात अनेक रुग्णांनी आपले प्राण गमावले. यासंबंधी इंडिया टुडेने बत्रा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर गुप्ता यांच्याशी चर्चा केली आहे.

“माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ऑक्सिजन नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. करोना रुग्णावर उपचार करताना ऑक्सिजन, औषधं आणि लसीकरणाची गरज आहे. पण यापैकी काहीच उपलब्ध नाही. सरकार म्हणतं देशात ऑक्सिजनचा मुबलक साठा शिल्लक आहे. पण रुग्ण मरत आहेत. न्यायपालिका की प्रशासन? हा देश नेमकं कोण चालवत आहे माहिती नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- “लॉकडाउन हा एकमेव पर्याय….पण हे सरकारला कळतच नाहीये”- राहुल गांधी

“सरकार गेल्या १४ महिन्यात नेमकं काय करत होतं? कोणीही काहीही शिकलेलं नाही. मेकशिफ्ट रुग्णालयं हा पर्याय नाही. तुम्ही तिथे ऑक्सिजन पाठवत आहात, पण नीट उभारण्यात आलेली रुग्णालयं नाहीत. कृपया आम्हाला ऑक्सिजन द्या, त्यासाठी आम्हाला भीक मागायला लावू नका, प्रत्येत १० ते १२ रुग्णालयांसाठी नोडल अधिकारी असला पाहिजे. आपतकालीन परिस्थितीत १५ ते २० मिनिटांत ऑक्सिजन उपलब्ध झाला पाहिजे जेणेकरुन लोकांना जीव गमावावा लागणार नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- ऑक्सिजन किती आहे, हे सांगणं सरकारने बंद करा आणि…; सुब्रमण्यम स्वामींनी मोदी सरकारला सुनावलं

कर्नाटक सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य असणारे डॉक्टर विशाल राव यांनी राज्यात आरोग्यासंबंधी उत्तम पायाभूत सुविधा असल्याचं म्हटलं आहे. राज्यातून देशभरात पुरवठा केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पण कर्नाटकमध्येच मागणीत दुपटीने वाढ झाली असल्याने समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले आहेत. याशिवाय वाहतूक एक मोठी समस्या असल्याचा उल्लेख त्यांनी केला. “उत्पादकांना सर्व राज्यांसाठीचे वाटप वाढवावे लागतील, तरच ही समस्या दूर होईल. त्यांना वाहतुकीसाठीदेखील पाठबळ दिले पाहिजे. ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी ग्रीन कॉरिडोर आवश्यक आहेत,” असं ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- मृत्यूचं तांडव सुरुच! सर्वाधिक करोना मृत्यूंच्या यादीत भारत जगात तिसऱ्या स्थानी

वैद्यकीय तज्ञ अरुण सेठी यांनी छोटे दवाखाने, नर्सिंग होम येथे ऑक्सिजन उपलब्ध अशून त्यांसंबंधी डेटा तयार करण्याची गरज बोलून दाखवली आहे. मोठ्या रुग्णालयांमध्ये त्यांची स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती क्षमता असली पाहिजे. लोकांना त्यांच्या दरवाजापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा का होऊ शकत नाही? गरज नसतानाही रुग्णालयामध्ये कशाला धाव घ्यायची? अशी विचारणा त्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 8:41 am

Web Title: coronavirus delhi batra hospital chief dr scl gupta on oxygen deaths sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “तुमच्याकडे चारच दिवस बाकीयत, काय करायचंय ते करुन घ्या”; योगी अदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी
2 ऑक्सिजन किती आहे, हे सांगणं सरकारने बंद करा आणि…; सुब्रमण्यम स्वामींनी मोदी सरकारला सुनावलं
3 २७ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर बिल गेट्स आणि मेलिंडा घेणार घटस्फोट
Just Now!
X