दिल्ली करोनाच्या चार पावलं पुढे असल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी यासोबत दिल्लीत निर्बंध शिथील करण्याचे संकेत दिले आहेत. करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिल्ली देशात तिसऱ्या क्रमांकावर असून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. दिल्लीमध्ये कायमचा लॉकडाउन ठेऊ शकत नाही असंही मत अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं आहे.

“करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं मान्य आहे. पण आपण घाबरण्याची गरज नाही. करोनाबिधित रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ झाली आणि रुग्णालयातील बेडची कमतरता भासू लागली तरच दिल्लीमधील परिस्थिती माझ्यासाठी चिंताजनक असेल,” असं अरविंद केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदरम्यान सांगितलं आहे.

dhairyasheel mohite patil latest marathi news
माढ्यात मोहिते – पाटलांचा प्रचार जानकर करणार, अखेर जानकर आणि मोहिते – पाटलांचा संघर्ष संपला
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
Former MLA Narayanarao Gavankar withdraws from Akola Lok Sabha constituency
माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांची माघार, अकोला भाजपमधील बंड…
kalyan woman gudi making business marathi news,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी कल्याणची गुढी

आणखी वाचा- “करोनाला रोखण्यासाठी कायमचा लॉकडाउन ठेऊ शकत नाही”

“कायमचा लॉकडाउन हा पर्याय नाही. काळजी घेत आपल्याला पुढील वाटचाल करावी लागणार आहे,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी लोकांना आता करोनासोबत जगायला शिकलं पाहिजे असं म्हटलं होतं. दिल्लीत करोनाचे १७ हजाराहून जास्त रुग्ण असून ३९८ जणांचा मृत्यू झाला आहे.

करोनाची परिस्थिती हाताळण्यावरुन टीका करणाऱ्यांना उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी हे घाणेरडं राजकारण करण्याची वेळ नाही, देशासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे असं आवाहन केलं आहे.