26 November 2020

News Flash

सणासुदीच्या काळात ‘या’ पाच राज्यांमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण वाढले!

आरोग्य मंत्रालयाने केले सावध ; जाणून घ्या कोणते आहेत ते राज्य

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या सण-उत्सवांचा काळ सुरू आहे. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील अधिक असल्याने करोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी माध्यमांना याबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ व दिल्ली या पाच राज्यांमध्ये सण-उत्सवांमुळे करोना संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. तर, दिलासादायक बाब ही आहे की मागील पाच आठवड्यांमध्ये करोनाच्या मृत्यू दरात घसरण झालेली आहे.

केवळ पाच राज्यांमध्ये ४९.४ टक्के प्रकरणं –
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटले की, मागील २४ तासांमध्ये करोनाची ४९.४ टक्के प्रकरणं या पाच राज्यांमध्ये समोर आली आहेत. सण-उत्सवांचा काळ हा देखील यासाठी मोठ्याप्रमाणावर कारणीभूत असू शकतो. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. आम्ही या राज्यांच्या सरकारबरोबर सातत्याने यावर चर्चा करत आहोत. करोनाच्या एकूण अॅक्टिव केसेस पैकी ७८ टक्के केसेस तर देशातील दहा राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्येच आहेत.

पाच आठवड्यांमध्ये मृत्यू दरात घसरण –
मागील २४ तासांमध्ये करोनामुळे झालेल्या मृत्यूंपैकी ५८ टक्के प्रकरणं ही पाच राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशातील असल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड आणि कर्नाटकचा समावेश आहे. मागील पाच आठवड्यांमध्ये करोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत घसरण झाली आहे. देशात आतापर्यंत करोनामुळे एक लाखांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 8:19 pm

Web Title: coronavirus during the festival season cases have increased in kerala west bengal maharashtra karnataka and delhi msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 जम्मू-काश्मीर : जमीन खरेदीच्या कायद्यातील बदलावर ओमर अब्दुल्ला भडकले, म्हणाले….
2 फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी विभागप्रमुख अंखी दास यांचा राजीनामा
3 मोदीजी जनतेला लुटणं सोडा, आत्मनिर्भर बना – राहुल गांधी
Just Now!
X