29 September 2020

News Flash

CoronaVirus : डॉक्टरांना वापरावा लागतोय ‘गारबेज बॅग’चा गाऊन

डॉक्टर्स आणि नर्सना वैयक्तिक सुरक्षेसाठी आवश्यक असणारी साधने पडू लागली कमी

संग्रहित छायाचित्र

करोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी, करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी सतत तत्पर असलेले डॉक्टर्स आणि नर्सेस आपल्या जीवाची पर्वा न करता अखंडपणे त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. हा व्हायरस झपाट्याने पसरत आहे. रुग्णांची संख्या पटीत वाढत चालली आहे. युरोपातील इटली, स्पेन आणि अन्य देशांच्या सार्वजनिक आरोग्यसेवेवर सध्या प्रचंड ताण येत आहे.

करोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि सेविकांना वैयक्तिक सुरक्षेसाठी आवश्य असणारी साधने तुटपुंजी पडू लागली आहेत. तोंडाला लावायचा मास्क, हातातील ग्लोव्ज, सुरक्षेसाठी घालावयाचा गाऊन इत्यादीचा तुटवडा जाणवू लागला आहे. काही ठिकाणी अशी परिस्थिती आली आहे की डॉक्टर्स आणि सेविकांना स्वत:च्या सुरक्षेसाठी ‘गारबेज बॅग’चा वापर करावा लागत आहे. सुरक्षेसाठी हाताला गारबेज बॅग गुंडाळणे अथवा गारबेज बॅगचा गाऊन तयार करून तो परिधान करणे असे उपाय ते करत आहेत.

करोना व्हायरसपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी इंग्लंडमधील नर्सेस ट्रॅश बॅग वापरत असल्याचे टीएमझीच्या वृत्तात म्हटले आहे.

स्पेनमध्येदेखील असेच चित्र आहे. करोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे देशाच्या वैद्यकीय सेवांवर मोठा ताण पडत आहे. माद्रिद शहरातील वैद्यकीय सेवा पुरविणारेदेखील या कठीण काळात गारबेज बॅगचा वापर करत असल्याचे सीएनएनच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.

झपाट्याने पसरत चाललेल्या करोना व्हायरसमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. जगभरात थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 6:29 pm

Web Title: coronavirus europe desperate doctors are shielded by trash bags doctors and nurses taping garbage bags to their bodies for protection against the novel coronavirus dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: खरी मर्दानी! २६३ भारतीय विद्यार्थ्यांना इटलीतून मायदेशी सुखरुप परत घेऊन आली
2 Coronavirus: सर्वांनी सरकारचे आदेश पाळायलाच हवेत – ओमर अब्दुल्ला
3 ‘करोना व्हायरस’नंतर ‘हंता व्हायरस’… चीनमध्ये एकाचा मृत्यू; ३२ जणांची घेण्यात आली चाचणी
Just Now!
X