27 May 2020

News Flash

‘तुम्ही करोना पसरवत आहात’, भरबाजारात महिला डॉक्टरांना मारहाण, लोक फक्त पाहत राहिले

देशात करोनाने थैमान घातला असून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत

देशात करोनाने थैमान घातला असून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. केंद्र आणि सोबत राज्य सरकारांकडून डॉक्टरांना नीट वागणूक दिली जावी असं सांगण्यात येत आहे. मात्र तरीही काही ठिकाणी डॉक्टरांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचं समोर आलं आहे. नुकतंच दिल्लीमधील सफदरजंग येथे कार्यरत असणाऱ्या दोन महिला डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला डॉक्टर घरातील सामान खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्या असताना त्यांना मारहाण करण्यात आली.

महिला डॉक्टर गौतम नगर येथे वास्तव्यास असून जवळच्या मार्केटमध्ये गेल्या होत्या. यावेळी तिथे एका व्यक्तीने त्यांचा रस्ता रोखला. ही व्यक्ती वारंवार त्यांना घराबाहेर पडल्यावरुन बोलत होती. तुमच्यामुळे करोना व्हायरसचा फैलाव होईल असं सांगत ही व्यक्ती डॉक्टरांना येथे थांबू नका सांगत अपमान करत होती. डॉक्टरांनी आक्षेप घेतला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही तिथे फळं विकत घेत होतो. तेव्हा ही व्यक्ती अंतर ठेवा असं ओरडून सांगत होती. करोना व्हायरसचा फैलाव करण्यासाठी त्याने आम्हाला जबाबदार ठरवलं आणि मारहाण केली”.

यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना बोलावलं. पण पोलीस येईपर्यंत आरोपीने पळ काढला होता. विशेष म्हणजे तिथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी आरोपीची कोणतीही माहिती पोलिसांना देण्यास नकार देत टाळाटाळ केली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. ४२ वर्षीय आरोपी इंटिरिअर डिझायनर असून त्याला अटक करण्यात आली आहे.

डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत करोनाचे ६६९ रुग्ण सापडले आहेत. तर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली सरकारने घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 10:31 am

Web Title: coronavirus female doctors assaulted in delhi sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुथूट ग्रुपचा १५, ००० कुटुंबांना मदतीचा हात, मोफत अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचा केला पुरवठा
2 हनिमूनला गेलेलं कपल लॉकडाउनमुळे मालदीवमध्ये अडकून पडलं पण…
3 Coronavirus : देशभरात 24 तासात 17 बळी, 540 नवे रुग्ण
Just Now!
X