14 August 2020

News Flash

मोठी बातमी! भारतात विकसित करोना लसीची मानवी चाचणी, ३० वर्षीय स्वयंसेवकाला दिला पहिला डोस

३० वर्षाय व्यक्तीला देण्यात आला भारतातील करोना लसीचा पहिला डोस

संग्रहित

भारतात विकसित करण्यात आलेल्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीस एम्स रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे. ३० वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. इंडिया टुडेने एम्स रुग्णालयातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस तयार केली आहे.

स्वयंसेवकाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर नंतर घरी पाठवण्यात येणार आहे. यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल. COVAXIN लसीचा हा पहिलाच डोस आहे. डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित ३० वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती. मानवी चाचणी कऱण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी तयारी दर्शवली होती. त्यातून या व्यक्तीची निवड करण्यात आली.

नक्की पाहा >> ऑक्सफर्डची करोना लस : जाणून घ्या नाव, किंमत आणि लसीकरणासंदर्भात

COVAXIN लस हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीकडून तयार केली जात असून यासाठी त्यांनी आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. नुकतंच त्यांना केंद्रीय औषध नियंत्रण विभागाकडून (डीसीजीआय) मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली होती.

पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर या लसीचा प्रयोग केला जाणार आहे. यामध्ये एम्स रुग्णालयातील १०० जण असणार आहेत. एम्सच्या एथिक्स कमिटीकडून चाचणीला मंजुरी मिळाल्यानंतर स्वयंसेवक बनण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर काही तासातच एक हजारापेक्षा जास्त जणांनी स्वयंसेवक बनण्यासाठी संपर्क साधला होता.

पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी निरोगी आणि सदृढ व्यक्तींची निवड केली जाणार असून यामध्ये १८ ते ५५ वयोगटातील व्यक्ती असणार आहेत. यामध्ये गर्भवती नसणाऱ्या महिलांचाही समावेश असणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर १४ दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे. लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर ज्यांच्यावर चाचणी केली त्या स्वयंसेवकांना तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. COVAXIN च्या वैद्यकीय चाचणीसाठी आयसीएमआरने देशभरात निवडलेल्या १२ ठिकाणांपैकी दिल्लीतील एम्स हे हे एक ठिकाण आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व १२ ठिकाणांवरील एकूण ७५० जणांवर लसीची चाचणी केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 4:12 pm

Web Title: coronavirus first dose of bharat biotech covaxin given to volunteer in aiims sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 Viral Video : नदीच्या मधोमध जाऊन सेल्फी काढत होत्या दोघी मैत्रिणी, अचानक वाढली पाण्याची पातळी आणि…
2 राज्यपाल विरुद्ध गेहलोत; काँग्रेस आमदारांची राजभवनात निर्दर्शनं
3 “…तर मी पायलट यांचे स्वागत करेन”; अशोक गहलोत यांची ‘ऑफर’
Just Now!
X