जगभरातील १८० हून अधिक देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अनेक देशांनी या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनची घोषणा केली आहे. भारतामध्येही २५ मार्च ते १४ एप्रिल असा २१ दिवसांचा पहिला लॉकडाउन संपल्यानंतर आता १५ एप्रिल ते ३ मे असा दुसरा लॉकडाउन सुरु झाला आहे. या लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी होईल असे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ऐन लग्नाच्या महिन्यांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने अनेकांना आपली लग्न पुढे ढकलावी लागली आहेत. काहींनी लग्न रद्द करुन अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं आहे. अशाप्रकारचे एक खास लग्न हरियाणामध्ये पार पडले.

हरियाणामधील रोहतक येथे राहणाऱ्या निरंजन कश्यप आणि मूळची मॅक्सिकोची असणाऱ्या डॅना यांनी १३ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज केलं. स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टनुसार या दोघांना करोना लॉकडाउन असतानाही लग्नाची परवाणगी देण्यात आली आहे. निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हे दोघे लग्न बंधनात अडकले.

या लग्नामागील आणखीन एक आश्चर्यकारक बाब म्हणजे दोन वेगळवेगळ्या देशामध्ये राहणारे निरंजन आणि डॅना चक्क एका एज्युकेशन अ‍ॅपच्या माध्यमातून भेटले. भाषा शिकण्यासंदर्भातील अ‍ॅपवर आमची ओळख झाल्याचे निरंजन सांगतो. “आम्ही एकमेकांना भाषा शिकवणाऱ्या अ‍ॅपच्या माध्यमातून भेटलो. त्यानंतर डॅना आणि तिची आई आमच्या लग्नासाठी ११ फेब्रुवारी रोजी भारतामध्ये आले होते,” अशी माहिती निरंजनने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

एएनआयने दिलेल्या या वृत्ताखाली अनेकांनी अभ्यासासंदर्भातील अ‍ॅपवर भेटलेल्या या जोडप्याच्या लग्नाबद्दल अनेक मजेदार प्रितिक्रिया नोंदवल्या आहेत. पाहुयात अशाच काही कमेंट…

मला पण स्पॅनिश शिकायचं आहे

भावा फक्त नाव सांग तू…

प्रत्येक अ‍ॅप डेटिंग अ‍ॅप

फक्त नाव सांगा एवढीच मागणी

याने तर भाषाच भारतात आणली

लॉट्री

 

सोशल डिस्टन्सिंग

इथे आमची बोटं झिजली आणि…

काही दिवसांपूर्वी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत औरंगाबादमध्ये मुस्लीम जोडप्याने अनोख्या पद्धतीने लग्न केलं होतं. औरंगाबादमधील मोहम्मद मिनहाजुद्द या तरुणाने बीडमधील तरुणीशी चक्क व्हिडिओ कॉलवरुन निकाह (लग्न) केला होता.