करोना व्हायरसमुळे पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर काही तासातच पतीचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. अमेरिकेत ही घटना घडली आहे. शनिवारी ८६ वर्षीय फेलिक्स यांचा ग्लेनब्रुक रुग्णालयात मृत्यू झाला. याच रुग्णालयात दीड तासापूर्वीच त्यांची पत्नी लुईजा यांचा मृत्यू झाला होता. दोघांनाही करोना व्हायरसची लागण झाली होती. दोघे करोना विषाणूंच्या संपर्कात कसे आले याची कुटुंबाला काहीच कल्पना नाही असं त्यांचा जावई एड ग्रीनवॉल्ड याने सांगितलं आहे. ते खूप सुंदर दांपत्य होतं. खूप चांगले आजी-आजोबा होते. कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग होते असं सांगताना ग्रीनवॉल्ड भावूक झाले.

फेलिक्स आणि लुईजा दोघेही २० वर्षांपूर्वी युक्रेनमधून अमेरिकेत स्थायिक झाले होते. अमेरिकेत स्थायिक होण्यापूर्वी फेलिक्स एका कन्स्ट्रक्शन कंपनीत सप्लाय मॅनेजर म्हणून काम करत होते. तर लुईजा डॉक्टर होत्या. फेलिक्स यांच्याबद्दल बोलताना नातेवाईकांनी त्यांच्यासाठी कुटुंबच सगळं होतं असं म्हटलं आहे. त्यांना बागेत काम करायला आवडत होतं. ते नेहमी शेजाऱ्यांसोबत याबद्दल गप्पा मारत असत असंही त्यांनी सांगितलं आहे.

Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
Kolhapur
कोल्हापूर : गणपतीची मूर्ती खाली आणताना रोप वायर तुटल्याने एकाचा मृत्यू; एक जखमी
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

फेलिक्स आणि लुईजा नेहमी आपलं इंग्लिश सुधारण्याचा आणि अमेरिकेतील जीवनशैली आत्मसात करायचा प्रयत्न करायचे. त्यांच्या जाण्याने नातेवाईक आणि कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. फेलिक्स आणि लुईजा यांच्यामागे दोन मुली आणि चार नातवंडं असा परिवार आहे.

अमेरिकेत आतापर्यंत करोनाचे एकूण १ लाख ८३ हजार ५३२ रुग्ण सापडले असून ३७२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगात आतापर्यंत ४१ हजार ३४३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या आकडेवारीत अमेरिका चीन आणि इटलीच्याही पुढे गेलं आहे.