03 June 2020

News Flash

धक्कादायक, पाच दिवसात भारतात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०२ टक्क्याने वाढली

१० मार्च ते २० मार्च या अवघ्या दहा दिवसात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५० वरुन १९६ वर पोहोचली.

(संग्रहित छायाचित्र)

करोना व्हायरसच्या रुपात भारत आरोग्य आणीबाणीचा सामना करत आहे. दररोज करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देशभरात झपाटयाने वाढत असून प्रशासनाला ते भाग सील करावे लागत आहेत. कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजे सामुदायिक संक्रमणाच्या फेजमध्ये अजून आपण पोहोचलेलो नाही असे सरकार म्हणत असले तरी दररोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत.

संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाउनमध्ये आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. त्यावरुन आपल्याला आरोग्य आणीबाणी किती गंभीर आहे ते लक्षात येते. १० मार्च ते २० मार्च या अवघ्या दहा दिवसात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५० वरुन १९६ वर पोहोचली. २५ मार्चला हाच आकडा ६०६ होता. महिनाअखेरीस ३१ मार्चला भारतात १३९७ जणांना करोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या आरोग्य आणीबाणीमुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर आणि अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे.

पाच दिवसात काय बदललं?

सामान्य स्थिती असताना पाच दिवस हा देशासाठी काही फार मोठा कालावधी नाही. पण करोना व्हायरसच्या संकटाचा विचार करताना हे पाच दिवस खूप महत्वाचे आहेत. २९ मार्च ते दोन एप्रिल या अवघ्या तीन दिवसात देशामध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,०२४ वरुन २,०६९ पर्यंत वाढली. या पाच दिवसात भारतात Covid-19 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 4:56 pm

Web Title: coronavirus in 5 days indias covid 19 cases increased by 102 dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये बाहेर फिरणाऱ्या बापाला मुलगा वैतागला; गाठल पोलीस स्टेशन अन् ….
2 क्वारंटाइन सेंटरमध्ये करण्यात आलं नमाज पठण
3 इंदूर: हल्ल्याला न घाबरता करोना विरोधात लढण्यासाठी डॉक्टर पुन्हा ड्युटीवर रुजू
Just Now!
X