26 November 2020

News Flash

दिलासादायक वृत्त… चार महिन्यानंतर पहिल्यांदाच करोनाबाधितांची संख्या ३७ हजारांखाली

भारताचा रिकव्हरी रेट ९०.६ टक्के

वयपरत्वे प्रतिकारशक्ती कमी होते असे म्हटले जाते, पण ऑक्सफर्ड लशीचा ज्येष्ठांमध्येही चांगला परिणाम दिसून आला. करोनाविरोधात त्यांची प्रतिकारशक्ती वाढली आहे.

भरतामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संखेतील घट सोमवारीही कायम आहे. आरोग्य मंत्रलयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३६ हजार ४६९ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. १८ जुलै रोजी ३४ हजार ८८४ करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर दररोज करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली होती. १७ सप्टेंबरपर्यंत देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत होती. त्यानंतर मात्र दररोज करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. ऑक्टोबर महिन्यात दररोज वाढणाऱ्या करोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी झाली आहे. दिलासादायक म्हणजे भारतात करोनावर मात करणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे तर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घट होत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्‍याण मंत्रालय (MoHFW) ने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ७९ लाख ४६ हजार ४२९ इतकी आहे. गेल्या २४ तासांत ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या एक लाख १९ हजार ५०२ इतकी झाली आहे.

उपचार घेणाऱ्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या २४ तासांत २७ हजार ८६० ने घट झाली आहे. सध्या देशात सहा लाख २५ हजार ८५७ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासांत देशात ६३ हजार ८४२ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ७२ लाख १ हजार ७० इतकी झाली आहे.

सध्या भारताचा रिकव्हरी रेट ९०.६ टक्के इतका झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 10:51 am

Web Title: coronavirus india daily case less than 37 thousand more than 72 lakh recovered nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 श्रीलंकन नौदलाचा भारतीय मच्छीमारांवर हल्ला
2 पाकिस्तानमध्ये मदरशात मोठा बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू; ७० जखमी
3 एकल पालकत्व स्वीकारलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांना मिळणार ‘चाइल्डकेअर लीव्ह’
Just Now!
X