जगात चीनपेक्षाही जास्त बळी इटलीमध्ये गेले असून तेथे करोना विषाणूने थैमान घातले आहे. इटलीमध्ये शनिवारी करोनामुळे ८८९ जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर इटलीमधील मृतांची एकूण संख्या १० हजारहून अधिक झाली आहे. इटलीबरोबरच स्पेन, फ्रान्स, ब्रिटन या युरोपीयन देशांमध्येही करोनाचा कहर दिसून येत आहे.  इटलीमध्ये अजून करोनाच्या साथीची परमोच्च अवस्था अजून काही दिवस दूर आहे. त्यामुळेच १० हजारहून अधिक मृत्यू झालेल्या इटलीबरोबरच जगातील करोना बळींची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

युरोपात तीन लाख लोकांना संसर्ग झाला असून करोना विषाणू आटोक्यात येण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. अमेरिकेत सध्या १ लाख ४ हजार रुग्ण असून अध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी खासगी कंपन्यांना वैद्यकीय उपकरणे बनवण्यास सक्ती करण्यासाठी युद्धकालीन अधिकारांचा वापर केला आहे. जीइ (जनरल इलेक्ट्रिक) कंपनीला व्हेंटिलेटर तयार करण्याची सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयांमुळे भविष्यात परिस्थिती सुधारेल अशा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेत एकूण साठ टक्के भागात सर्व व्यवहार बंद आहेत.

फोटोगॅलरी >> करोनाने इटलीत का घेतले इतके बळी?; जाणून घ्या २० महत्वाच्या गोष्टी

अमेरिकेखालोखाल सर्वाधिक संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या इटलीमध्ये आहे. इटलीमध्ये करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या शनिवारी ९२ हजार ४७२ इतकी होती. तर मरण पावलेल्यांची संख्या शनिवारी १० हजार २३ इतकी होती. त्यामुळेच भविष्यात इटलीमधील लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीवर आलेले हे सर्वात मोठे संकट असल्याचे सांगितलं जात आहे.

नक्की वाचा >> “आम्ही सर्व आशा सोडून दिल्यात” म्हणत खरंच इटलीचे पंतप्रधान रडले का?; जाणून घ्या सत्य

इटलीमधील लॅम्बार्डी प्रांताला करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून शनिवारी तेथे ५४२ जणांचा मृत्यू झाल्याचे रॉयटर्सने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. लॅम्बार्डीमध्ये करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या पाच हजार ९४४ इतकी झाली आहे. म्हणजेच इटलीत एकूण मरण पावलेल्यांपैकी अर्ध्याहून अधिक मृत्यू हे लॅम्बार्डीमध्ये झाले आहेत.

नक्की वाचा >> Coronavirus: जो मूर्खपणा इटली, जर्मनी, स्पेन व अमेरिकेच्या नागरिकांनी केला तोच भारतीय करतायत

नक्की वाचा >> इटलीने करोनाग्रस्त वृद्धांना मरायला सोडून दिलंय का? वाचा खरं काय आहे…

इटलीचे पंतप्रधान गिसीपी काँटे यांनी युरोपीयन महासंघाकडे मदतीची मागणी केली आहे. तसेच काँटे यांनी ४.७ बिलीयन युरोच्या पॅकेजची घोषणाही केली आहे.