09 April 2020

News Flash

Coronavirus: हात धुवून करोनाच्या मागे लागा -उद्धव ठाकरे

भारतात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०० च्या पुढे गेली आहे.

Coronavirus Live Updates: भारतात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०० च्या पुढे गेली आहे. गुरुवारी देशभरात करोना व्हायरसमुळे ७ जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशात करोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या सर्व गर्दीच्या ठिकाणी शुकशुकाट आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी जनतेशी संवाद साधला. स्वच्छता राखा. हात धुवत रहा आणि हात धुवूनच करोनाविरोधातील लढा जिंकायचा आहे. त्यामुळे हात धुवून करोनाच्या मागे लागा, असं आवाहन ठाकरे यांनी केलं.

Live Blog

20:58 (IST)27 Mar 2020
आभाळ कोसळलेलं नाही, मात्र घराबाहेर पडाल तर कोसळेल - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून जनतेला आवाहन, जास्तीत जास्त वेळ घरात राहणं गरजेचं

20:54 (IST)27 Mar 2020
पोलिसांवर किती ताण टाकायचा यावर विचार करायला हवा - उद्धव ठाकरे

गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी लोकं रस्त्यावर येत आहेत, नागरिकांनी असे प्रकार करु नये - मुख्यमंत्री

20:53 (IST)27 Mar 2020
खासगी डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन

आपले दवाखाने बंद ठेवू नका...रुग्ण आढळल्यास सरकारी रुग्णालयात पाठवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

20:52 (IST)27 Mar 2020
शिर्डी-सिद्धीविनायक देवस्थानाचे मुख्यमंत्र्यांकडून आभार

मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केल्याप्रकरणी मानले आभार

शिर्डी संस्थानाकडून मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ कोटी, तर सिद्धीविनायक संस्थांकडून ५ कोटींची मदत

20:10 (IST)27 Mar 2020
मनुष्यबळ विकास मंत्रालयाची घोषणा

वैद्यकीय प्रवेश परीक्षा "नीट" अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

20:01 (IST)27 Mar 2020
शाळांना सुट्ट्या असल्याने शिक्षकांना पोषण आहार योजनेतील धान्य सडण्याची भीती

पोषण आहार योजना ठप्प पडल्याने शिल्लक धान्य सडण्याऐवजी ते गरजूंना देण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी वर्धा येथील शिक्षक संघटनांनी राज्य शासनाकडे केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीने एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचे आज जाहीर केले. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

19:52 (IST)27 Mar 2020
करोनाच्या विषाणूंचं मायक्रोस्कोपिक चित्र

भारतीय शास्त्रज्ञांनी प्रथमच करोनाच्या विषाणूंचं मायक्रोस्कोपिक चित्र जगासमोर आणलं आहे. यासाठी त्यांनी भारतातील करोनाचा पहिल्या रुग्णाचे नमुने घेतले होते. ३० जून रोजी केरळमध्ये पहिला रुग्ण सापडला होता. याची माहिती IJMR मध्ये छापण्यात आली आहे.

19:09 (IST)27 Mar 2020
जनता दाराच्या आत; अडचणींना तोंड देत लॉकडाउनला सकारात्मक प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यामुळे सुरूवातीच्या काळात लोकांनी जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, आता नागरिकांमधील भीती कमी होत असून, गर्दीही विरळ झालेली आहे. विशेषतः स्वतःची काळजी घेतानाच लोक सोशल डिस्टनशिंग लोक पाळताना दिसत आहेत. 

19:05 (IST)27 Mar 2020
Coronavirus: लॉकडाऊनमुळे दुचाकीवरुन वडिलांचा मृतदेह नेण्याची मुलांवर दुर्दैवी वेळ

लॉकडाऊनमुळे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मुलांना दुचाकीवरुन वडिलांचा मृतदेह न्यावा लागल्याची दुर्दैवा घटना डहाणूत घडली आहे. कासा उपजिल्हा रुग्णालयात हा दुर्दैवी प्रकार घडला. करोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या देशात लॉकडाऊन सुरू असून आहे. लॉकडाउनमुळे रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्याचा फटका कासा भागातील पालघर तालुक्यातील चिंचारे येथील एका कुटुंबाला बसला. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने न्ही मुलांना वडिलांचा मृतदेह दुचाकीवरून न्यावा लागला. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

18:59 (IST)27 Mar 2020
लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा संघर्ष सुरुच

पाहा पुण्यातील कात्रत परिसरातले हे बोलके फोटो - करोनाशी लढा : पाठीवर हात ठेवून….

18:56 (IST)27 Mar 2020
आंतरराष्ट्रीय आणि देशातंर्गत वाहतूक १४ एप्रिलपर्यंत राहणार बंद

देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील बंदी १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी नागरी विमान उड्डाण महासंचालनालयाने ३१ मार्चपर्यंत विमान वाहतूक बंद राहील असा निर्णय घेतला होता. मात्र केंद्र सरकारने १४ एप्रिल पर्यंत २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर विमान वाहतूकही तोपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

18:55 (IST)27 Mar 2020
उद्धव ठाकरे आज काय घोषणा करणार? राज्याला करणार संबोधित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. करोनाला पायबंद घालण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणखी काय नवीन घोषणा करतात का? याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.

18:45 (IST)27 Mar 2020
शवागारात मृतदेह ठेवायला जागा नाही

करोना व्हायरसमुळे इटली आणि स्पेन हे युरोपातील दोन देश अत्यंत भयंकर परिस्थितीचा सामना करत आहेत. तिथे दररोज मृतांची संख्या वाढत आहे. खरंतर या देशातील आरोग्य सेवांची उत्तम आरोग्य सेवांमध्ये गणना होते. पण करोना व्हायरसच्या आक्रमणापुढे हे देश हतबल झाले आहेत. वाचा सविस्तर बातमी

18:33 (IST)27 Mar 2020
‘करोना’बाबत अमिताभ बच्चन यांचा दावा चुकीचा, आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दोन दिवसांपूर्वी करोना व्हायरसबाबत केलेला दावा आरोग्य मंत्रालयाकडून फेटाळण्यात आला आहे. माश्यांमुळे करोनाचा प्रादुर्भाव होत नाही असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी गुरूवारी (दि.२६) दिले. अमिताभ बच्चन यांनी माश्यांमुळे करोनाचा प्रसार होतो, असा दावा केला होता.

18:24 (IST)27 Mar 2020
फक्त 7,500 रुपयांत बनवणार व्हेंटिलेटर

करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी देशभरात व्हेंटिलेटर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असताना दिग्गज ऑटोमेकर कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने दिलासादायक वृत्त दिलं आहे. अवघ्या सात हजार पाचशे रुपयांमध्ये व्हेंटिलेटर बनविण्याची तयारी कंपनीने केली आहे. सविस्तर बातमी वाचा

18:05 (IST)27 Mar 2020
गरजूंसाठी धनंजय मुंडेंची धाव, पाच हजार गरिबांना २१ दिवसांच्या किराणा सामानाचं वाटप

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांची संचारबंदी लागू झाल्याने हातावर पोट असलेल्या असंघटित कामगार, मजूर, रोजंदारी मजूर, हातरिक्षा चालक, घरकाम करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या ‘नाथ प्रतिष्ठान’च्या वतीने ५००० गरजूंना २१ दिवस पुरेल इतके किराणा सामान मोफत वाटप करण्यास सुरूवात केली आहे. परळी शहरतील विविध भागातुन गरजूंची यादी करण्यात आली असुन दारासमोर जाऊन सामान दिले जाणार आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

17:04 (IST)27 Mar 2020
ब्रिटनच्या पंतप्रधानांही करोनाची लागण

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला काही लक्षणं जाणवत असून स्वत:ला विलगीकरणात ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

16:31 (IST)27 Mar 2020
इस्लामपूरमधला तो भाग बंद केला जाणार

सांगलीतील इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातल्या १२ जणांना करोनाची लागण झाली आहे. ज्या भागात हे १२ जण राहतात तो भाग बंद करण्यात असल्याचं ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. तसंच या कुटुंबातील एकाच व्यक्तीला बाहेर पडता येईल. त्याच्या हातावर शिक्का मारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

16:30 (IST)27 Mar 2020
होम क्वारंटाइन असलेला IAS अधिकारी घरातून पळाला

केरळ येथे होम क्वारंटाइन असणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याने घरातून पळ काढला असल्याचं समोर आलं आहे. १८ मार्चपासून हा अधिकारी सरकारी निवासस्थानी होम क्वारंटाइमध्ये होता. अधिकाऱ्याने घरातून पळ काढत उत्तर प्रदेशातील आपलं गाव गाठलं. कोल्लम येथे उप-जिल्हाधिकारी पदावर असणाऱ्या अनुपम मिश्रा यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कठोर कारवाई केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

16:07 (IST)27 Mar 2020
करोना झाल्याच्या भीतीनं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा रिर्पोट आला निगेटिव्ह

हवाई वाहतूक सेवा सुरू असताना परदेशातून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला होता. यात ऑस्ट्रेलियातून परतलेल्या एका तरुणाला करोना सदृश्य लक्षणं दिसून आल्यानं दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. मात्र, करोना झाल्याच्या भीतीनं त्यानं रुग्णालयातच आत्महत्या केली होती. त्याचा रिर्पोट निगेटिव्ह आला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

15:54 (IST)27 Mar 2020
महाराष्ट्रात १२ नवे रुग्ण, करोनाग्रस्तांची संख्या १४७

सांगलीत आढळले १२ नवे रुग्ण, महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही १४७ वर पोहचली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारी ही बातमी आहे. 

15:42 (IST)27 Mar 2020
इराणमध्ये आणखी १४४ जणांचा मृत्यू

इराणला अजूनही करोना व्हायरसला नियंत्रित करता आलेले नाही. तिथे मृतांचा आकडा वाढत चालला आहे. करोना व्हायरसमुळे शुक्रवारी इराणमध्ये आणखी १४४ जणांचा मृत्यू झाला. इराणमध्ये मृतांची संख्या २,३७८ पर्यंत पोहोचली आहे.

15:31 (IST)27 Mar 2020
१२ लाखांचं नुकसान होत असतानाही १०० दुकानांचं भाडं केलं माफ

करोनामुळे अनेकांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. हातावर पोट असणाऱ्यांच्या तर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण अशावेळी समाजातील काही लोक मदतीसाठी पुढे येत असून समाजाचे खरे हिरो ठरत आहे. केरळमधील चकुन्नी यांना जेव्हा करोनामुळे अनेक दुकानदारांना नुकसान सहन करावं लागत असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी असं काही केलं ज्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी

15:16 (IST)27 Mar 2020
रिझर्व्ह बँकेने कर्जवसुली स्थगितीसाठी सल्ल्याऐवजी स्पष्ट निर्देश द्यावेत : अजित पवार

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्हं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होणार आहे. त्यांच्या या निर्णयाचं स्वागत आहे. परंतु देशातील बँका आणि वित्तीय संस्थांनी तीन महिन्यांसाठी कर्जवसुली स्थगित करावी, असा केवळ सल्ला देऊन या बँका ऐकणार नाहीत. त्यांना रिझर्ब्ह बँकेकडून स्पष्ट निर्देश जाणे अपेक्षित आहे, असं मत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं.सविस्तर वाचा

14:55 (IST)27 Mar 2020
शाब्बास! विलगीकरणात राहणाऱ्यांसाठी विद्यार्थ्याने तयार केलेलं संकेतस्थळ देशविदेशात ठरतंय लोकप्रिय

करोनामूळे विलगीकरणात बंदिस्त झालेल्यांना विरंगुळा म्हणून शालेय विद्यार्थ्याने तयार केलेले संकेतस्थळ देशविदेशात लोकप्रिय ठरू लागले आहे. विदेशातून किंवा परप्रांतातून आलेल्यांना शासकीय किंवा गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. चौदा दिवसाचे संपर्कविहीन वास्तव्य अनेकांसाठी अस्वस्थ करणारे ठरते. या एकांतवासाला गृह विलगीकरणात थोडाबहुत कुटूंबियाच्या सहवासाचा दिलासा असतो. मात्र कठोर विलगीकरणात हा एकांतवास कष्टदायी ठरत असल्याची कानावर आलेली चर्चा एका दहावीच्या विद्यार्थ्याला अस्वस्थ करणारी ठरली. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी

14:35 (IST)27 Mar 2020
Coronavirus : मुख्यमंत्री सहाय्यता निधीला शिर्डी संस्थानकडून ५१ कोटी

14:26 (IST)27 Mar 2020
Coronavirus : ‘ट्रम्प खोटं बोलतायेत’; विनोदवीर कॅथी ग्रिफिनचा आरोप

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिकेत करोनाग्रस्त रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार सुरु असून लवकरच आम्ही यातून मार्ग काढू’ असं सांगितलं होतं. मात्र ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचा आरोप विनोदवीर कॅथी ग्रिफिनने केला आहे. ट्विटरवर एक फोटो शेअर करत तिला रुग्णालयात कशी वागणूक मिळतीये याविषयीचं कथन केलं आहे. पुढे वाचा...

14:25 (IST)27 Mar 2020
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने केली १.२५ कोटींची मदत

'स्टायलिश स्टार' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अल्लू अर्जुन याने १.२५ कोटी रुपयांची मदत केली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्यातील करोनाग्रस्तांसाठी त्याने हा मदतीचा हात पुढे केला आहे. पुढे वाचा..

14:24 (IST)27 Mar 2020
Good News: महाराष्ट्रात करोनाच्या १९ रुग्णांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत असला तरी दुसऱ्या बाजूला डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. करोना व्हायरसमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना डिस्चार्ज मिळण्याचे प्रमाण वाढणार आहे अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. वाचा सविस्तर बातमी

14:24 (IST)27 Mar 2020
Good News: महाराष्ट्रात करोनाच्या १९ रुग्णांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत असला तरी दुसऱ्या बाजूला डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. करोना व्हायरसमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना डिस्चार्ज मिळण्याचे प्रमाण वाढणार आहे अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. वाचा सविस्तर बातमी

14:19 (IST)27 Mar 2020
'लॉकडाउन'वर मात : वर्षाच्या चिमुकल्यासाठी आईनं ३०किमी पायी जात गाठलं हॉस्पिटल

पोटच्या पोरासाठी आई प्रत्येक अडचणीवर मात करत असते, असं म्हटले जातं. याचीच प्रचिती देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये आली आहे. उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथील एका महिलेनं लॉकडाउनवर मात करत पोटच्या बाळाचा जीव वाचवला आहे. त्यासाठी त्या मातेला ३० किमीचा पायी प्रवास करावा लागला...सविस्तर वाचा

14:16 (IST)27 Mar 2020
कोणत्याही अफवा पसरवू नका, सरकारचं आवाहन

अर्थविषयक सेवा विभागाने कोणत्याही अफवा पसरवू नका असं आवाहन जनतेला केलं आहे. ग्राहक सेवेशी संंबंधित शाखा या अत्यावश्यक सेवांमध्ये येतात. त्यामुळे बँका बंद होणार या प्रकारच्या कोणत्याही अफवा पसरवू नये आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. 

14:04 (IST)27 Mar 2020
Blog: एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचं मुंबईकरांसाठी पत्र

नमस्कार,माझं नाव शिवराज यादव….माझे वडील पोलीस आहेत. म्हणजे आता ते निवृत्त झालेत पण माझा भाऊ आणि बहिण पोलिसात आहेत. दोघंही कॉन्स्टेबल पदावर आहेत. हो तोच पोलीस ज्याला तुम्ही पांडू वैगेरे अशा अनेक नावांनी हाका मारता. ज्याच्याकडे तुम्हाला आदराने कधी पाहवंसंही वाटत नाही किंवा कधी आपुलकीने चौकशीही करावीशी वाटत नाही. असो तुम्ही ते करावं अशी माझी अपेक्षाही नाही. मी एक विनंती करण्यासाठी आज आलो आहे. तुम्हाला माहितीये की गेल्या काही दिवसांपासून आपल्या राज्यात करोना नावाचा शत्रू आला आहे. तेव्हापासून माझा भाऊ, बहीण आणि त्यांच्यासारखे इतर सगळेच पोलीस कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. संपूर्ण ब्लॉग वाचण्यासाठी

14:03 (IST)27 Mar 2020
पंजाबमध्ये करोनामुळे मृत्यू होण्यापूर्वी रुग्णाने घेतली १०० जणांची भेट, २३ जणांना लागण; १५ गावं सील

पंजाबमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीमुळे राज्यातील २३ जणांना लागण झाली आहे. १८ मार्च रोजी या व्यक्तीचं निधन झालं. पंजाबमध्ये एकूण ३३ जणांना करोनाची लागण झाली असून यापैकी २३ जण हे त्या मृत व्यक्तीच्या संपर्कात आले होते अशी शक्यता व्यक्ती केली जात आहे. गुरुद्वारात धर्मगरु असणाऱी संबंधित ७० वर्षीय व्यक्ती दोन आठवड्यांसाठी परदेशात वास्तव्यास होती. जर्मनी आणि इटली येथे आपल्या शेजारच्या गावातील दोन मित्रांसोबत ते गेले होते. मात्र परतल्यानंतर त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं नव्हतं. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी 

13:45 (IST)27 Mar 2020
भारतीय लष्कराने सुरु केलं ‘ऑपरेशन नमस्ते’

करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज आहे. Covid 19 विरोधातील या लढयाला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ नाव दिले आहे. भारताचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्याशी इंडियन एक्स्प्रेसने संवाद साधला. लष्करप्रमुख नरवणे यांना करोना व्हायरसच्या फैलावाचा लष्कराच्या कामकाजावर काय परिणाम झाला आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला. सविस्तर बातमीसाठी वाचा

13:34 (IST)27 Mar 2020
पिंपरीत तीन रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी-चिंचवडमधील तीन करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, त्यांना आणखी दोन आठवडे होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितले आहे अशी माहिती डॉ. विनायक पाटील यांनी दिली आहे. गेल्या १४ दिवसांपासून पाटील हे त्यांच्यावर उपचार करत होते. आज तिघांना रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले असून त्यापूर्वी तिघांचे आणि डॉ. विनायक पाटील यांचे पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि इतर स्टाफने टाळ्या वाजवून उत्साह वाढवला.

12:17 (IST)27 Mar 2020
राजकुमार रावकडून रोजंदारी कामगारांना आर्थिक मदत

या कसोटीच्या काळात रोजंदारीवर म्हणजेच हातावर पोट असलेल्या कामगारांवर वाईट वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी आता अभिनेता राजकुमार राव पुढे सरसावला आहे. राजकुमार रावने रोजंदारी कामगारांना आर्थिक मदत केली आहे. पुढे वाचा...

11:48 (IST)27 Mar 2020
Coronavirus : ट्रेनमध्येच उभारणार ‘ICU’ सह इतर सेवा; मोदी सरकारचा प्लॅन

देशातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी आणि जर भविष्यात करोनाचा प्रदुर्भाव ग्रामिण भागात झाल्यास मोठी हाणी होण्याची शक्यता आहे. ते पाहाता मोदी सरकारनं रेल्वेतच विविध मेडिकल सुविधांची तयारी सुरू केली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, रेल्वेच्या बोगींना आयसीयू, क्वारंटिन वार्ड आणि आयसोलेशन सेंटरमध्ये बदलण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत. जेणेकरून या हलाकीच्या परिस्थितीत ग्रामीण भांगामध्ये स्वास्थ्य स्वेवा वेळेवर पोहचेल. सविस्तर वाचा

11:47 (IST)27 Mar 2020
चैत्र वारीसाठी भाविकांनी पंढरीत येऊ नका, करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराज मंडळींचे आवाहन

वारकरी संप्रदायातील महत्वाची मानली जाणारी चैत्र वारीसाठी राज्य तसेच शेजारील राज्यातील भाविकांनी पंढरीत येऊ नये. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक पाहून चैत्र वारीसाठी कोणीही दिंडी तसेच वैयक्तिक देखील पंढरीत येऊ नये. असे आवाहन वारकरी संप्रदाय पाईक संघाचे अध्यक्ष ह.भ.प.देवव्रत महारज वासकर आणि महारजमंडळीनी केले आहे. चैत्र वारीचा मुख दिवस म्हणजेच चैत्र एकादशी ४ एप्रिल रोजी आहे....आणखी वाचा

11:42 (IST)27 Mar 2020
पोलिसांच्या कठोर भूमिकेवर शरद पवार म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबुकवरुन राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जनतेला भेडसावणाऱ्या काही प्रश्नांना उत्तरे दिली. एका व्यक्तीने पोलिसांचा त्रास होतोय, पोलीस सक्ती करतायत त्या संदर्भात प्रश्न विचारला, त्यावर शरद पवारांनी या विषयाला दोन बाजू असल्याचे सांगितले. सविस्तर बातमी वाचा

11:18 (IST)27 Mar 2020
करोनाशी सगळ्यांनी एकत्र लढा देण्याची गरज शरद पवार

राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना यांनी काही निर्णय तातडीने घेतले आहेत. करोनाचं संकट लक्षात घेऊन आपण हे सगळं करतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. करोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं, देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन परीणाम होणार आहे यात काहीही शंका नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.  करोनाशी लढा आपण एकत्रितपणे देऊ. सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करा असंही आवाहन शरद पवार यांंनी केलं.

10:50 (IST)27 Mar 2020
पुण्यात आणखी दोघे करोनामुक्त

पुण्यातील नायडू रुग्णालयातील करोना बाधित दोन रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्या दोघांची डिस्चार्ज प्रक्रिया झाली आहे. आतापर्यंत सात रुग्ण करोना मुक्त झाले आहेत : महापौर मुरलीधर मोहोळ

10:34 (IST)27 Mar 2020
Good news : गृह, वाहन कर्ज होणार स्वस्त

करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवप रेपो दरात कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात केल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली. तसंच नागरिकांनी संयम बाळगावा, असंही त्यांनी नमूद केलं. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीर रिझर्व्ह बँकेकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली.

09:54 (IST)27 Mar 2020
चीनने UNSC मध्ये रोखली करोना व्हायरसवरील बैठक

सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतासह जगाच्या वेगवेगळया भागांमध्ये या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. युरोपातील इस्तोनिया या देशाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत करोना व्हायसरवर चर्चेची मागणी केली होती. तसा रितसर प्रस्तावही त्यांनी दिला होता. सविस्तर बातमी वाचा

09:47 (IST)27 Mar 2020
Coronavirus : ‘बाहुबली’चा देशासाठी मदतीचा हात; ४ कोटींची केली मदत

करोना विषाणूशी लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. प्रत्येक जण या महामारीपासून वाचण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहेत. यामध्येच सरकारची मदत व्हावी यासाठी काही सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटींनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने आर्थिक मदत केली आहे. प्रभासने करोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी  तब्बल ४ कोटी रुपयांच्या आर्थिक मदत केली आहे. पुढे वाचा...

09:25 (IST)27 Mar 2020
करोनाचा प्रभाव वाढण्याआधी घ्या विमा कवच, अवघ्या ४९९ रुपयांमध्ये होणार उपचार

जगातील करोनाचा वाढता संसर्ग पाहाता भविष्यात भारतात या रोगाचा संसर्ग वाढण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे अनेकांच्या खिशाला झळ बसू शकते. या रोगावर सध्या कोणतीच गौळ्या-औषधं उपलबद्ध नाहीत. संसर्ग झाल्यानंतर सुरूवातीच्या काळातच हा रोग आटोक्यात येत असल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे. पण उशीर झाल्यास या रोगावर तुर्तास तरी उपचार शक्य नाही. अशातच करोनावर उपचार करणायासाठी लागणाऱ्या पैशातून वाचण्यासाठी अवघ्या ४९९ रूपयांचा विमा तुम्ही घेऊ शकता...सविस्तर वाचा

09:22 (IST)27 Mar 2020
Coronavirus : ATM मधून पैसे काढताना या सात गोष्टींची काळजी नक्की घ्या

करोना व्हायरसचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. करोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एसबीआयनं ग्राहकांना रोख रकमेऐवजी डिजिटल माध्यामांचा वापर करा असा सल्ला दिला आहे. डिजिटल माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करून करोनाचा संसर्ग रोखण्याचा सल्ला एसबीआयनं दिला आहे...सविस्तर वाचा

09:18 (IST)27 Mar 2020
Coronavirus : रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतील हे अन्न पदार्थ

झपाट्याने कोरोनाव्हायरसचा जागतिक प्रसार होत आहे, याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक यंत्रणा असणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत या विषाणूच्या रोगाचा कोणताही वैद्यकीय उपचार उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे, गंभीरपणे आपण आपली वैयक्तिक काळजी घेतली पाहिजे, आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे आवश्यक आहे आणि संक्रमण टाळण्यासाठी निरोगी अन्न पदार्थ खाल्ले पाहिजेत. सुदैवाने, निसर्गाने आपल्याला जरुरीपेक्षा जास्त अन्न दिले आहे, ज्यामुळे निरोगी राहू शकतो.सविस्तर वाचा...

09:18 (IST)27 Mar 2020
लॉकडाउन मधली माणुसकी!

अवघा देश करोनामुळे लॉकडाउन झाला आहे. महाराष्ट्रात तर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १३० झाली आहे. अशात रस्त्यांवर शुकशुकाट आहे. या लॉकडाउनमध्ये लोक बाहेर पडणं टाळत आहेत. अशात नागपूरमध्ये दोन बहिणी अशा आहेत ज्या मास्क लावून आणि हातात अन्न घेऊन बाहेर पडल्या आहेत. रस्त्यावर भटकणारे कुत्रे उपाशी मरु नयेत यासाठी या दोघीजणीही या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत आहेत. काजल आणि दिशा अशी या दोन बहिणींची नावं आहेत.

टॅग Coronavirus
<p class="appstext"><img src="https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.png" width="24" height="24" style="margin-right:0;"><strong><em>लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल <a onclick="ga( "send", "event", "Telegram_Click", "click", "https://t.me/LoksattaLiveOfficial" );" href="https://t.me/LoksattaLiveOfficial" target="_blank"> (@Loksatta) </a> जॉइन करण्यासाठी <a href="https://t.me/LoksattaLiveOfficial" target="_blank" onclick="ga( "send", "event", "Telegram_Click", "click", "https://t.me/LoksattaLiveOfficial" );"> येथे क्लिक करा </a> आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.</em></strong></p>

First Published on March 27, 2020 8:53 am

Web Title: coronavirus latest news update india lockdown positive cases deaths in world
Next Stories
1 देशासाठी कायपण… बजाज देणार १०० कोटी तर गोदरेज देणार ५० कोटींचा निधी
2 G20 परिषद : आर्थिक हित नाही, तर मानवतावादी दृष्टीकोन हवा – पंतप्रधान
3 Coronavirus: पंतप्रधान मदत निधीला CRPF ने दिले ३३ कोटी ८१ लाख
Just Now!
X