जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्यातच भारतातील रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सराकारनं मोठी पावलं उचलली आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचं लॉकडाउन घोषित केलं आहे. आज या लॉकडाउनचा चौथा दिवस आहे.

Live Blog

21:04 (IST)28 Mar 2020
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नव्या खात्याची निर्मिती; मदत जमा करण्याचे आवाहन

राज्यातील करोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर या कार्यात मदत करु इच्छिणाऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नव्या खात्याची निर्मिती करण्यात आली आहे. या खात्यात इच्छुकांनी सढळ हाताने मदत जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. संपूर्ण बातमी वाचा

20:35 (IST)28 Mar 2020
पुण्यात आणखी तीन करोनाबाधित रुग्ण आढळले

पुणे शहरात दोन दिवसांत एकही करोनाबाधित रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरली असतानाच आज (शनिवारी) पुन्हा तीन करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता २४वर पोहोचली आहे. नव्यानं सापडलेले हे रुग्ण करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले आहेत.

20:28 (IST)28 Mar 2020
करोनामुळे सालदार नेमण्याची शेकडो वर्षांची परंपरा खंडीत

वर्षभराच्या शेतीकामासाठी गुढीपाडव्याला सालदार नेमण्याची परंपरा यावेळी करोना व्हायरसमुळे प्रथमच खंडीत झाली असून शेतकऱ्यांपुढे नवा प्रश्ना उभा झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामीण भागात सालदार नेमण्याची परंपरा आहे. वर्षभर एकाच मालकाकडे ठराविक रक्कमेवर सर्व ती कामे करणारा गडी म्हणजे सालदार समजला जातो. वर्षभराची बिदागी ठरवली जाते. मात्र यावर्षी विदर्भातील ग्रामीण भागात हा सालदार नेमलाच गेला नाही. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंक

19:42 (IST)28 Mar 2020
टाटा सन्सकडून अतिरिक्त १००० कोटी रुपयांची मदत जाहीर

टाटा ट्रस्टने केंद्र सरकारला विविध उपाययोजनांसाठी ५०० कोटी रुपयांच्या मदतीची शनिवारी घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच टाटा सन्सने अतिरिक्त १००० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे टाटा ग्रुपने एकून १५०० कोटी रुपये करोनाशी लढण्यासाठी दिले आहेत. संपूर्ण बाचमी वाचा

19:00 (IST)28 Mar 2020
मोदींकडून 'पीएम-केअर्स' निधीची स्थापना; जनतेला केलं मदतीचं आवाहन

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पंतप्रधान सहाय्यता आणि आपत्कालिन स्थिती मदत निधी'ची (पीएम-केअर्स) स्थापना केली आहे. सर्व क्षेत्रातील लोकांना या निधीमध्ये आपली मदत पाठवता येणार आहे.

18:53 (IST)28 Mar 2020
यवतमाळ करोनामुक्त

राज्यात करोनाबधितांची संख्या वाढत असताना यवतमाळमधून दिलासा देणारी बातमी आली आहे. यवतमाळ जिल्हा करोनामुक्त झाला आहे. येथील स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या तीन करोनाबाधित रुग्णांचे अखेरचे तपासणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे या तिघांनाही आता विलगीकरण कक्षातून आाज शनिवारी सुट्टी देण्यात आली आहे. यासोबतच यवतमाळ रुग्णांची संख्या शुन्यावर आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी

18:29 (IST)28 Mar 2020
अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत

करोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची कक्षा वाढवण्यासाठी तसंच नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी संशोधनासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर अभिनेता अक्षय कुमारने २५ कोटींची मदत जाहीर केली आहे. 

17:40 (IST)28 Mar 2020
गर्भवती असतानाही दिवसरात्र झटत तयार केलं करोना टेस्ट किट

करोना व्हायरससोबत लढा देताना भारतात चाचणीसाठी योग्य ती सुविधा नसल्याची टीका केली जात होती. मात्र महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भोसले यांनी दिवसरात्र मेहनत करत भारतातील पहिलं करोना टेस्ट किट तयार केलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मिनल भोसले या गर्भवती असतानाही करोना टेस्ट किट तयार करण्यासाठी झटत होत्या. करोना टेस्ट किट जन्माला घातल्यानंतर काही तासातच त्यांनी आपल्या बाळाला जन्म दिला. मायलॅब डिस्कव्हरी भारतातील पहिली फार्माकंपनी आहे ज्यांना टेस्ट किटची निर्मिती तसंच विक्री करण्याची परवानगी मिळाली आहे. टेस्ट किट तयार केल्यानंतर पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा आणि बंगळुरु येथील १५० लॅबना पाठवण्यात आलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी

17:32 (IST)28 Mar 2020
टाटा ट्रस्टकडून सर्वात मोठी मदत; करोनाशी लढण्यासाठी दिले ५०० कोटी

करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये टाटा ट्रस्टने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५०० कोटी रुपये देऊ केले आहेत. यापूर्वी बजाज ग्रुपने १०० कोटी रुपयांची मदत करोनाशी लढण्यासाठी सरकारला देऊ केली होती.

16:40 (IST)28 Mar 2020
स्थलांतर करणाऱ्यांना टोलनाक्यावर अन्न-पाणी पुरवा; नितीन गडकरींचे आदेश

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक मोठ्या शहरांमध्ये रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले नागरिकत आता घराकडे निघू लागले आहेत. पायी प्रवास सुरु असलेल्या या लोकांना वाटेत अन्न आणि पाणीही मिळत नाहीए. याबाबत विविध प्रसार माध्यमांमधून वृत्त प्रसारित होऊ लागल्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अशा स्थलांतरीत लोकांना टोलनाक्यांवर अन्न-पाणी पुरवण्याच्या सूचना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि टोल ऑपरेटर्सना दिल्या आहेत.

16:11 (IST)28 Mar 2020
करोनाच्या धास्तीने आत्महत्या, पंचगंगा नदीत उडी घेत संपवलं आयुष्य

भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८७३ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. लोकांमध्ये या अनोख्या व्हायरसची प्रचंड भीती पसरली असून कोल्हापुरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे...वाचा सविस्तर

15:54 (IST)28 Mar 2020
“आम्ही तुमचा सांभाळ करु”, त्यांनी दिलेली मायेची हाक ऐकून दीडशे कुटुंब परतली माघारी

देशभरातील मजूरांचा आपल्या गावाकडे लोंढा निघाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत असतानाच वर्धा येथील दोघा ‘सचिन’ने पूढाकार घेत विनंती केल्यावर दीडशेवर परप्रांतीय गावातच थांबण्यास तयार झाले आहे. जय महाकाली संस्थेचे सचिन अग्निहोत्री व वैद्यकीय मंचचे डॉ. सचिन पावडे या दोघांनी केलेली विनवणी प्रशासनास दिलासा देणारी ठरली. सविस्तर बातमी वाचा

15:29 (IST)28 Mar 2020
पाकिस्तानात १४०० करोना पॉझिटिव्ह रुग्ण, ११ जणांचा मृत्यू

पाकिस्तानात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पाकिस्तानात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४०० पर्यंत जाऊन पोहोचली आहे. सिंध प्रांतापाठोपाठ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये करोनाच्या रुग्णांची मोठी संख्या आहे. वाचा सविस्तर बातमी.

15:28 (IST)28 Mar 2020
Coronavirus: भारतात अडकलेल्या नागरिकांसाठी अमेरिकेचा मोठा निर्णय

करोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं असून अनेक नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. दरम्यान भारतात अडकलेल्या नागरिकांसाठी अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. या सर्व नागरिकांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. यासाठी अमेरिकेकडून तयारी सुरु करण्यात आला आहे. भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने अमेरिकेतील जवळपास दोन हजाराहून जास्त नागरिक अडकले आहेत. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

15:10 (IST)28 Mar 2020
ट्रक अडवल्यानंतर शेतकऱ्याने केला थेट उद्धव ठाकरेंना मेसेज अन्….

करोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या राज्यात संचारबंदी लागू असल्याने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून जीवनाश्यक वस्तू वगळता इतर सर्व वाहतूक रोखण्यात येत आहे. अशाच नाकाबंदीत पोलिसांनी हिंगोलीतील एका शेतकऱ्याचा ट्रक अडवला. ट्रकमधून हा शेतकरी शेतातील संत्री घेऊन चालला होता. पोलिसांनी ट्रक अडवल्याने शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेसेज केला आणि मदत मागितली. यानंतर जे काही घडलं त्यावरुन उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं जात आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंक

14:53 (IST)28 Mar 2020
सुखद बातमी : अभिनेता टॉम हँक्सने केली करोनावर मात

चीनमधील वुहान शहरातून उद्रेक झालेल्या करोना विषाणूने जगभरात त्याचे पाय पसरवले आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येक जण या विषाणूपासून वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत. काही दिवसापूर्वी हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता टॉम हॅक्स (Tom Hanks) आणि त्याची पत्नी रिटा विल्सन (Rita Wilson) यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. परंतु आता हॅक्स आणि त्याच्या पत्नीने करोनावर मात केली असून ते घरी परतले आहेत. पुढे वाचा...

14:25 (IST)28 Mar 2020
काबूल गुरुद्वारा हल्ला, इसिसच्या हल्लेखोरांमध्ये एक जण केरळमधला


अफगाणिस्तानात काबूलमध्ये बुधवारी शिखांच्या प्रार्थनास्थळावर हल्ला झाला. गुरुद्वारावर झालेल्या या हल्ल्यामध्ये केरळमधल्या एकाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. इस्लामिक स्टेटच्या तीन आत्मघातकी हल्लेखोरांपैकी एकाची ओळख केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी पटवली आहे. त्याचे नाव मोहम्मद मुहसीन आहे. वाचा सविस्तर बातमी.

13:51 (IST)28 Mar 2020
केरळमध्ये करोनाचा पहिला मृत्यू; देशात २४ तासांत १४९ नवे बाधित रुग्ण

केरळमध्ये करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. केरळमधील करोनाचा हा पहिलाच बळी आहे. एर्नाकुलम येथील मेडिकल कॉलेजमध्ये या ६९ वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात १४९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

13:25 (IST)28 Mar 2020
Coronavirus च्या ‘फेक’ वेबसाइट्सचा सुळसुळाट, दिल्ली पोलिसांनी जारी केली लिस्ट

भारतात करोनाग्रस्तांचा आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने लोकांची चिंता वाढलीये. त्यामुळे या व्हायरसची लागण होऊ नये यासाठी इंटरनेटद्वारे करोनाबाबत जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. पण दुसरीकडे, हॅकर्स ही एक संधी म्हणून पाहतायेत. हॅकर्स आणि ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांच्या समूहाकडून करोना व्हायरसच्या नावाने फेक वेबसाइट बनवून ‘शिकार’ साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा धोका ओळखून दिल्ली पोलिसांच्या सायबरक्राइम डिव्हिजनने ट्विटरद्वारे अशा धोकादायक वेबसाइट्सची यादी जारी केलीये.(वाचा सविस्तर)

12:54 (IST)28 Mar 2020
तीन दिवसांपासून मी व्यवस्थित जेवलेलो नाही

मी गुजरात अहमदाबाद येथून आलो आहे. मला उत्तर प्रदेश आग्रा येथे जायचे आहे. मला अहमदाबाद सोडायचे नव्हते पण मालकाने मला पैसे आणि रेशन द्यायला नकार दिला. मी मागच्या तीन दिवसांपासून मी व्यवस्थित जेवलेलो नाही अशी व्यथा एका मजूराने सांगितली.

12:51 (IST)28 Mar 2020
करोनामुळे प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू

हॉलिवूड सुपरस्टार मार्क ब्लम यांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांना दिली. काही दिवसांपूर्वी त्यांनी करोनाची लागण झाली होती. ते ६९ वर्षांचे होते. पुढे वाचा..

12:49 (IST)28 Mar 2020
खाकी वर्दीची माणूसकी! २१ दिवस पाकिस्तानी शरणार्थींचा करणार सांभाळ

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आला आहे. पण यामुळे काही जणांचे हाल होत आहेत. या कठिण परिस्थितीत खाकी वर्दीतल्या पोलिसांकडून गरजूंना मदतीचा हात पुढे केला जात आहे. वाचा सविस्तर बातमी.

12:47 (IST)28 Mar 2020
पुण्यात आढळला करोनाबाधित रुग्ण

पुण्यात आणखी एक करोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून कोणत्या कारणामुळे त्यांना करोनाची लागण झाली आहे, हे स्पष्ट झालं नाही. 

12:11 (IST)28 Mar 2020
सांगलीत करोना व्हायसरची चाचणी करणारी लॅब का नाही?

राज्य सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगली-इस्लामपूरमधील जनतेला सरकारी सूचनांचे पालन करुन काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी सर्वसामान्यांकडून आलेल्या काही प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. सविस्तर बातमी वाचा.

11:59 (IST)28 Mar 2020
Coronavirus : हिरो नाही तर सुपरहिरो; करोना विषाणूशी लढण्यासाठी केली कोट्यवधींची मदत

करोना विषाणूशी लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. प्रत्येक जण या महामारीपासून वाचण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहेत. सरकारदेखील विविध योजनांची अंमलबजावणी करत असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करत आहे. यामध्येच काही सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटींनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. विशेष म्हणजे ही मदत करण्यात दाक्षिणात्य कलाकार अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतंय. पुढे पाहा...

 

11:32 (IST)28 Mar 2020
मोबाइल, लॅपटॉपमधूनही पसरु शकतो करोना व्हायरस

जगभरात वेगाने फैलावत असलेल्या करोना व्हायरससंबंधी योग्य माहिती मिळत नसल्यामुळे लोकांच्या मनात भिती आणि चिंतेने घर केले आहे. आवश्यकतेपेक्षा लोक जास्त काळजी घेत आहेत. साधा सर्दी, खोकला झाल्यास करोना तर झाला नाही ना? असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. लोकांना पडणाऱ्या याच प्रश्नांसंबंधी उत्तरे जाणून घ्या. सविस्तर बातमी वाचा.

11:32 (IST)28 Mar 2020
मोबाइल, लॅपटॉपमधूनही पसरु शकतो करोना व्हायरस

जगभरात वेगाने फैलावत असलेल्या करोना व्हायरससंबंधी योग्य माहिती मिळत नसल्यामुळे लोकांच्या मनात भिती आणि चिंतेने घर केले आहे. आवश्यकतेपेक्षा लोक जास्त काळजी घेत आहेत. साधा सर्दी, खोकला झाल्यास करोना तर झाला नाही ना? असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. लोकांना पडणाऱ्या याच प्रश्नांसंबंधी उत्तरे जाणून घ्या. सविस्तर बातमी वाचा.

11:01 (IST)28 Mar 2020
महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी

महाराष्ट्रात ६ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १५९ वर गेली होती. मात्र आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील करोनाग्रसतांची संख्या १७७ झाली आहे. आज सकाळीच मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आता १५९ झाल्याचं राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलं होतं. मात्र आता ही संख्या १७७ वर जाऊन पोहचली आहे. 

10:48 (IST)28 Mar 2020
व्हेंटिलेटर्स संबंधी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना व्हेंटिलेटर्सची गरज निर्माण होत आहे. त्यामुळे जगभरातून व्हेंटिलेटर्सना मोठया प्रमाणावर मागणी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेंटिलेटर्ससंबंधी महत्वाची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर बातमी.

10:32 (IST)28 Mar 2020
अलिबाग : जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जमावबंदीचे आदेश धुडकावून रस्त्यावर फिरणाऱ्या विरोधात रायगड पोलीसांनी १८ गुन्ह्यांची नोंद केली आहे. तर समाजमाध्यमांवर अफवा परसविणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

10:29 (IST)28 Mar 2020
देशातल्या करोनाग्रस्तांची संख्या ८७३

करोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन पुकारला आहे. दरम्यान ANI ने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८७३ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मागच्या दोन महिन्यात विदेशातून भारतात १५ लाख प्रवासी आले आहेत. या सगळ्यांना देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. २४ तासात १४९ नवे रुग्ण आढळ्याने ही संख्या वाढली आहे.

10:27 (IST)28 Mar 2020
अलिबाग : वाहतुक बंदीचा औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम

संचारबंदीमुळे रायगड जिल्ह्यातील औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात येणारी औषधांची वाहतुक बंद आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर जिल्ह्यात औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती औषध वितरकांनी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा

10:25 (IST)28 Mar 2020
मांजरीलाही झाली ‘करोना’ची लागण, मालकिणीकडून झाला संसर्ग?

जगभरात फैलाव झालेल्या करोना व्हायरसचा आता पाळीव प्राण्यांमध्येही शिरकाव झालाय. कुत्र्यांनंतर आता बेल्जियममध्ये एका मांजरीला करोना व्हायरची लागण झाल्याचं वृत्त आलं आहे. मांजरीला करोनाची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. बेल्जियमच्या आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे या मांजरीला तिच्या मालकीणीकडून करोनाची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. मानवातून प्राण्यामध्ये व्हायरसचा प्रसार झाल्याची दाट शक्यता येथे वर्तवण्यात येत आहे.(वाचा सविस्तर)

10:14 (IST)28 Mar 2020
‘वटवाघुळ खाण्याच्या विचित्र पद्धतीमुळे महामारी’; अभिनेत्याची आगपाखड

चीनमधून फैलाव झालेल्या करोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जग भीतीच्या छायेखाली वावरत आहे. अनेक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याच कारणास्तव संपूर्ण जगाचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. करोना विषाणूमुळे सध्या जगात निर्माण झालेल्या या परिस्थितीला बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने चीनला जबाबदार धरलं आहे. पुढे वाचा...

10:13 (IST)28 Mar 2020
वडोदरामध्ये आणखी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण


वडोदरामध्ये एका ६६ वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वडोदरामध्ये आता करोनाग्रस्तांची एकूण संख्या नऊ झाली आहे. प्रोटोकॉलनुसार या रुग्णावर उपचार सुरु आहे अशी माहिती वडोदराच्या जिल्हाधिकारी शालिनी अग्रवाल यांनी दिली.

09:33 (IST)28 Mar 2020
महाराष्ट्रात सहा नवे करोनाग्रस्त, रुग्ण संख्या ५९

महाराष्ट्रात ६ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १५९ वर गेली आहे. मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आता १५९ झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्यखात्याने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच घरातच थांबा, करोनाला रोखा असं आवाहनही करण्यात आलं आहे. तरीही महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

09:16 (IST)28 Mar 2020
पिंपरी-चिंचवडमधील पाच करोना बाधितांची पहिली टेस्ट निगेटिव्ह

पिंपरी-चिंचवडमधील पाच करोना बाधितांची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केलं आहे. या सर्व रुग्णांवर भोसरी येथील नवीन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची १४ दिवसानंतर ची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली असून त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती डॉ. लक्ष्मण गोफने यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी तीन करोनामुक्त तरुणांना घरी सोडण्यात आले आहे. 

09:13 (IST)28 Mar 2020
‘करोना व्हायरस’मुळे जगभरात २००९ पेक्षाही मोठी आर्थिक मंदी , IMF प्रमुखांचा इशारा

“संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचं आता स्पष्ट झालं असून ही मंदी २००९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटापेक्षाही वाईट असेल”, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या(IMF) प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी म्हटलंय. शुक्रवारी (दि.२७) एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना जॉर्जीव्हा यांनी करोना व्हायरसमुळे जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचं सांगत चिंता व्यक्त केली. (वाचा सविस्तर)

09:12 (IST)28 Mar 2020
नायडू रुग्णालयातील सिस्टरशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला संवाद

पुण्यातील नायडू रुग्णालयात करोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. या रुग्णालयातील नर्स छाया यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि त्यांच्या कामाचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन करोनाग्रस्तांसाठी सातत्याने कष्ट घेणाऱ्या नायडू रुग्णालयातील डॉक्टर आणि सिस्टर्स आणि इतर सगळ्यांचं मनोधैर्य उंचावणारा ठरला. हॅलो सिस्टर, नमस्ते तुम्ही कशा आहात? अशी मराठीत सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छाया यांच्याशी संवाद साधला.

09:11 (IST)28 Mar 2020
'या' खासगी लॅबमध्येही करू शकता करोनाची चाचणी

देशात करोनाचा प्रादुर्भावर वाढत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारनं करोनाची चाचणी करण्यास खासगी लॅबनाही मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा यादी