News Flash

Lockdown 3: कोणत्या झोनमध्ये कोणत्या गोष्टी सुरु राहणार आणि कोणत्या बंद?

काही सेवा सरसकट सर्व झोन्समध्ये बंद राहणार आहेत तर काही सेवांसाठी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सूट

देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने एक पत्रक जारी केलं आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. मात्र हा टप्पा पुर्ण होताच ४ मे पासून तात्काळ स्वरुपात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन सुरु राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या पत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टींवरील बंदी कायम राहणार आहेत याची यादीच दिली आहे.

नवीन नियमांप्रमाणे काही मर्यादित गोष्टी देशभरामध्ये बंदच राहणार असल्याचं गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये सरसकटपणे काही सेवा बंदच ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही गोष्टींना सुट देण्यात आली आहे.

या गोष्टी देशभरात सर्व झोन्समध्ये बंद राहणार

विमान सेवा
रेल्वे सेवा
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारी रस्ते वाहतूक
शाळा, कॉलेजेस, क्लासेस
हॉटेल, रेस्टॉरंट
सार्वजनिक ठिकाणी गर्दी होतील अशी सर्व ठिकाणे बंद
सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना बंदी
चित्रपटगृहे
मॉल
व्यायामशाळा
स्पोर्ट्स कॉमप्लेक्स

मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीने देशाभरामध्ये काही ठराविक कारणासाठी लोकांना रेल्वे तसेच हवाई मार्गाने आणि रस्ते मार्गाने प्रवासाची मुभा असेल.

देशभरातील ६५ वर्षांवरील नागरिक, आजारी वयोवृद्ध नागरिक, गरोदर महिला, १० वर्षांपेक्षा कमी वयाची मुलांच्या मुलांनी घरीच थांबावे.

रेड झोनमध्ये काय सुरु काय बंद?

सायकल रिक्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सीवर बंदी

दोन जिल्ह्यांमध्ये होणारी बस वाहतूक बंद ,

केशकर्तनालय दुकाने, स्पा बंद

रेड झोनमध्ये परवानगी घेऊन चारचाकीमध्ये दोन व्यक्तींना प्रवासाची मुभा असेल.

अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता सर्व दुकाने रेड झोनमध्ये बंद राहतील. मात्र कॉलिनीमध्ये असणारी दुकाने उघडी ठेवणाची परवानगी आहे.

आरेंज आणि ग्रीन झोनचं काय?

ऑरेंज झोनलाही रेड झोन प्रमाणेच नियम असतील फक्त तेथे टॅक्सी आणि रिक्षा सेवेला मुभा देण्यात आली आहे.

ग्रीन झोनमध्ये सर्व देशभरात लागू होणारी बंधने राहणार आहेत. मात्र तिथे ५० टक्के बस चालवाव्यात अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 7:04 pm

Web Title: coronavirus lockdown 3 a limited number of activities will remain prohibited across india what will be allowed and what will be not scsg 91
Next Stories
1 देशात आता तिसरा लॉकडाउन : आणखी दोन आठवडे टाळेबंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2 मोदी सरकारचा मोठा निर्णय: अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सुरु करण्याची परवानगी
3 Lockdown इफेक्ट, ३० वर्षानंतर उत्तर प्रदेशातून दिसतायत हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा
Just Now!
X