करोनामुळे स्थलांतरित कामगारांवर किती मोठं संकट आलंय, याचा ताजं भयावह उदाहरण समोर आलं आहे. आपल्या गावी जाण्यासाठी महाराष्ट्रातून सलग तीन प्रवास करून यूपीमध्ये पोहोचलेल्या एका ६० वर्षीय कामगाराचा वाटेतच भूकबळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, या कामगारानं आपल्या कुटुंबासोबत गुरुवारी रात्री एका ट्रकवर बसून महाराष्ट्रातून प्रवास सुरू केला होता. रविवारी पहाटे ते युपीतील कनौज जिल्ह्यात पोहोचले. त्यानंतर त्यांनी त्यांचं गाव असलेल्या हरदोई जिल्ह्याकडे पायी जाण्यास सुरूवात केली. मात्र, एक किलोमीटर चालल्यानंतर कामगार कोसळून पडला.

शैलेश कुमार सिंग या अधिकाऱ्यानं सांगितलं की, “प्राथमिक तपासातून असं दिसतंय की या कामगाराचा मृत्यू भुकेमुळे गेला आहे. त्यांनी गुरुवारी प्रवास सुरू केला होता. शेवटचं त्यांनी शुक्रवारी खायले होते. त्यानंतर ते बिस्किट आणि पाण्यावर होते. पण याबाबत आम्ही आणखी माहिती घेत आहोत.”