News Flash

चिंताजनक! करोना रुग्णांच्या यादीत भारत १० व्या क्रमांकावर

भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश आलेलं नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे

संग्रहित छायाचित्र.

भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश आलेलं नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी भारताने इराणला मागे टाकलं असून करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात भारतात ६५६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एका दिवसात मिळालेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर १५३ मृत्यूंची नोंद झाली आहे.

भारतातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या चार हजारावर पोहोचली आहे. यामुळे अमेरिका, रशिया, स्पेन, ब्राझील, इंग्लंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्कस्थान नंतर आता १० व्या क्रमांकावर भारत पोहोचला आहे. भारतात सध्या ७५ हजार ७०० करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांच्या आकडेवारीत भारत अमेरिका, रशिया, ब्राझिल आणि फ्रान्सनंतर पाचव्या क्रमांकावर आहे. जगभरात सध्या करोनाचे एकूण २८ लाख अॅक्टिव्ह रुग्ण असून एकट्या अमेरिकेत ही संख्या ११ लाख आहे.

देशात महाराष्ट्र अद्यापही पहिल्या क्रमांकावर असून ३०४१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकट्या मुंबईत १७२५ नवे रुग्ण मिळाले आहेत. यासोबत राज्याने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ३० हजाराच्या पुढे गेली आहे. राज्यात ५८ नव्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १६३५ झाली आहे. तामिळनाडूत ७६५ नवे रुग्ण सापडले असून रुग्णसंख्या १६ हजार २७७ झाली आहे. आठ रुग्णांच्या मृत्यूसोबत मृतांची संख्या ११२ झाली आहे.

वादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालने आतापर्यंतचे सर्वाधिक २०८ रुग्ण आढळले आहेत. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३६७७ झाली असून २७२ मृतांची नोंद झाली आहे. करोनाचा फटका बसलेल्या पहिल्या तीन राज्यांमध्ये गुजरातचाही क्रमांक असून ३९४ नवे रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या १४,०६३ वर पोहोचली असून मृतांच्या संख्या ८५८ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 9:03 am

Web Title: coronavirus lockdown india now among 10 covid hit nations sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “नेहरू, इंदिरा गांधी यांनी भारतीयांसाठी काही केलं असतं तर…”; स्थलांतरितांवरुन भाजपाने सुनावले
2 Corona: अमेरिकेकडून पाकिस्तानला ४५ कोटींची आर्थिक मदत, एकूण १५९ कोटींची मदत करण्याची घोषणा
3 यापुढे युपीमधील कामगार हवे असतील तर राज्य सरकारची परवानगी बंधनकारक: योगी
Just Now!
X