21 January 2021

News Flash

तबलिगी जमातने करोनाचा फैलाव केला नसता तर आतापर्यंत लॉकडाउन संपला असता – बबिता फोगट

तबलिगी जमातवर टीका केल्याने बबिता फोगटने आपल्या धमक्या मिळत असल्याचं सांगताना सणसणीत उत्तर दिलं आहे

भारतात करोना दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर तबलिगी जमात असल्याचं वक्तव्य केल्याने ट्रोल होत असलेल्या भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तबलिगी जमातवर टीका केल्याने बबिता फोगटने आपल्या धमक्या मिळत असल्याचं सांगताना सणसणीत उत्तर दिलं आहे. यावेळी तिने तबलिगी जमातने करोनाचा फैलाव केला नसता तर आतापर्यंत लॉकडाउन संपला असता असंही म्हटलं आहे.

बबिता फोगटने तबलिगी जमातवर निशाणा साधला होता. यानंतर अनेकजण बबिता फोगटचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्याची मागणी करत आहेत. इतकंच नाही तर तिला फोन, मेसेज करुन धमकावलंही जात आहे. बबिता फोगटने ट्विटरला व्हिडीओ अपलोड करत आपली बाजू मांडली असून धमकावणाऱ्यांना तुमच्या धमक्यांना घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही अशा शब्दांत सुनावलं आहे.

“काही दिवसांपूर्वी मी ट्विट केले होते. त्यानंतर अनेक लोक मला फेसबुक, ट्विटरला मेसेज पाठवून शिव्या देत आहेत, धमकावत आहेत. काही लोक फोन करुनही धमक्या देत आहे. त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की, कान उघडून ऐका आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या धमक्यांना घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही,” असं बबिता फोगटने म्हटलं आहे.

आणखी वाचा- “तुमच्या धमक्यांना घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही”, बबिता फोगटचं सणसणीत उत्तर

पुढे तिने सांगितलं आहे की, “मी तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणारी नाही. मी बबिता फोगट आहे. नेहमी आपल्या देशासाठी लढली आहे आणि असंच लढत राहणार, बोलत राहणार. मी माझ्या ट्विटमध्ये काहीही चुकीचं लिहिलेलं नाही. मी आपल्या ट्विटवर कायम आहे आणि यापुढेही राहीन. मी फक्त त्या लोकांबद्दल लिहिलं आहे ज्यांनी करोना विषाणूचा फैलाव केला आहे. तबलिगी जमात अजूनही एक नंबरवर नाही का ? असं मला तुम्हाला विचारायचं आहे. तबलिगी जमातने करोनाचा फैलाव केला नसता तर आतापर्यंत लॉकडाउन संपला असता आणि भारताने करोनाला हरवलं असतं”.

“ज्यांना सत्य ऐकण्यात समस्या आहे त्यांना सांगायचं आहे की मी सत्य बोलत राहणार, लिहित राहणार. तुम्हाल सत्य ऐकायला आवडत नसेल तर आपली सवय बदला किंवा सवय लावून घ्या,” अशा शब्दांत बबिता फोगटने टीका करणाऱ्यांना ऐकवलं आहे.

आणखी वाचा- तबलिगी जमातवर शांत का? अशोक पंडित यांचा जावेद अख्तर यांना सवाल

दरम्यान ट्विटरला एकीकडे बबिता फोगटला विरोध होत असून #SuspendBabitaPhogat हॅशटॅगसोबत ट्रोलं केलं जात असताना तिला समर्थनही मिळत आहे. बबिता फोगटला समर्थन करणाऱ्यांनी #ISupportBabitaPhogat हा हॅशटॅगही ट्रेंड केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 5:23 pm

Web Title: coronavirus lockdown indian wrestler babita phogat tweet video on tablighi jamaat sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 देशातील करोनाग्रस्तांच्या वाढीच्या दरात ४० टक्के घट, आरोग्य मंत्रालयाची माहिती
2 विना मंत्रिमंडळ सर्वाधिक काळ सरकार चालवण्याचा रेकॉर्ड ‘या’ मुख्यमंत्र्यांच्या नावावर
3 ‘मोदी सरकार गरिबांसाठी हेलिकॉप्टरमधून पैसे पाडणार’, असं वृत्तांकन करणाऱ्या न्यूज चॅनेलला नोटीस
Just Now!
X