News Flash

IAS अधिकाऱ्याकडून तबलिगींचा ‘हिरो’ म्हणून उल्लेख, सरकारकडून कारणे दाखवा नोटीस

अधिकाऱ्याने ट्विट करत तबलिगी जमातच्या सदस्यांचं कौतुक केलं होतं

तबलिगी जमातच्या सदस्यांचं कौतुक करत त्यांचा हिरो म्हणून उल्लेख करणाऱ्या कर्नाटकमधील आयएएस अधिकाऱ्याला राज्य सरकारने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. मोहम्मद मोहसीन असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. मोहम्मद मोहसीन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत तबलिगी जमातच्या सदस्यांचं कौतुक केलं होतं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “उपचार घेऊन बरे झालेले तबलिगी जमातचे सदस्या ज्यांनी प्लाझ्मा उपचारासाठी पुढाकार घेतला आहे ते हिरो आहेत आणि त्यांच्या या योगदानाकडे दुर्लक्ष केलं जात आहे”.

“३०० हून अधित तबलिगी हिरो प्लाझ्मा थेरपीसाठी पुढाकार घेत असून देशाची सेवा करत आहेत. पण मीडियाचं काय ? या हिरोंकडून मानवतेसाठी केलं जाणारं हे काम ते दाखवणार नाहीत,” असं ट्विट मोहम्मद मोहसीन यांनी २७ एप्रिल रोजी केलं होतं.

आणखी वाचा- तबलिगी जमातशी संबंधित लोकांनी करोना विषाणूचे वाहक म्हणून काम केलं – योगी आदित्यनाथ

कर्नाटक सरकारने या ट्विटची दखल घेतली असून मोहम्मद मोहसीन यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. ३० एप्रिल रोजी ही नोटीस बजावण्यात आली असून मोहम्मद मोहसीन यांना उत्तर देण्यासाठी पाच दिवस देण्यात आले आहेत. योग्य उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येईल असाही उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

मोहम्मद मोहसीन यांना नोटीसबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी करोनासंबंधीच्या हेल्पलाइन क्रमांकाची माहिती देण्यासाठी जवळपास ४० ते ५० पोस्ट केल्या आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचं आवाहनही केलं आहे”. मोहम्मद मोहसीन याआधी ओडिशा येथील प्रचारसभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याचा आदेश दिल्याने चर्चेत आले होते. यावेळी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 3:23 pm

Web Title: coronavirus lockdown karnataka ias officer gets show cause notice over tweet on tablighi jamaat sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कोलकाता : लॉकडाउनमध्ये दारु पिऊन बाहेर फिरायची हुक्की, ३ उद्योगपतींना अटक
2 करोना रुग्णांची संख्या वाढताच, पंजाबने ठाकरे सरकारला धरले जबाबदार
3 मध्य प्रदेश : ‘ती’ ची करोनावर यशस्वीरित्या मात, वय अवघे…
Just Now!
X