News Flash

चेन खेचत मजुरांनी श्रमिक ट्रेनमधून उड्या मारुन काढला पळ, रेल्वे स्थानकावर उडाला गोंधळ

ट्रेन स्थानकाजवळ पोहोचण्याआधीच मजुरांनी चेन खेचच मारल्या ट्रेनमधून उड्या

संग्रहित

श्रमिक ट्रेनमधून उडी मारण्यासाठी मजुरांनी एमर्जन्सी चेन खेचल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रेल्वे आणि आसाम पोलिसांनी कारवाई करत ६१ जणांना अटक केली आहे. तर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही ट्रेन मुंबईहून आलेली होती. यावेळी काही मजुरांनी क्वारंटाइन व्हावं लागू नये यासाठी ट्रेनची चेन खेचून उडी मारुन पळ काढला होता.

ही ट्रेन मुंबईहून आसाम येथील दिब्रुगढ येथे चालली होती. ही लोकमान्य टिळक श्रमिक ट्रेन आसाममधील होजाई रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर चेन खेचण्याचं मजुरांनी ठरवलं होतं. घटना घडली त्याच रात्री रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई करत होजाई रेल्वे स्थानकावर उतरलेल्या ५६ प्रवाशांना अटक केली. तर इतरांना आसाम पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या सहाय्याने बुधवारी सकाळी अटक केली.

ट्रेनमधून पळ काढलेल्या एका प्रवाशाला होजाई मार्केटमधून अटक करण्यात आली. सर्व मजूर मुंबईहून परतलेले असल्याने घटनेची माहिती मिळताच होजाई रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ आणि भीती निर्माण झाली. मुंबई करोनाच्या हॉटस्पॉटच्या यादीत असून ४० हजाराहून जास्त रुग्ण आढळले आहेत. मुंबईहून हजारो, लाखोंच्या संख्येने मजूर आपल्या राज्यात परतत आहेत.

आसाममध्येही करोनाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ पहायला मिळत आहे. बुधवारी आसाममध्ये १११ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या १६७२ वर पोहोचली आहे. तर चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 10:49 am

Web Title: coronavirus lockdown migrants pull chain to jump off shramik train in assam sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चिंता वाढली… २४ तासांत आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक करोनाबाधित
2 पाठलाग करुन प्रॉपर्टी डिलरची हत्या, जीव वाचवण्यासाठी गाड्यांच्या पाठीमागे लपण्याचा करत होता प्रयत्न
3 फटाके खायला देऊन हत्या करणं ही भारताची संस्कृती नाही, हत्तीणीच्या हत्येची केंद्राकडून गंभीर दखल
Just Now!
X