01 March 2021

News Flash

जी म्हणजे जिनिअस: लॉकडानमध्येही पारलेची जबरदस्त कमाई, मोडला ८२ वर्षांचा रेकॉर्ड

लॉकडानमध्येही कंपन्या बंद होत असताना पारलेची जबरदस्त कमाई, आतापर्यंतच्या सर्वाधिक विक्रीची नोंद

लॉकडाउनमध्ये एकीकडे अनेक कंपन्या तोट्यात असताना पारले जी बिस्किटाने मात्र आतापर्यंतच्या सर्वाधिक विक्रीची नोंद केली आहे. पाच रुपयांपासून मिळणारा पारले जी बिस्कीटाचा पुडा अनेक स्थलांतरित मजुरांसाठी दोन वेळचं अन्न ठरलं होतं. कित्येक किलोमीटर चालत निघालेल्या मजुरांना पोटाला आसरा म्हणून स्वस्तात मिळणारे पारले जी बिस्कीटाचे पुडे विकत घेतले होते. याशिवाय लॉकडाउनमुळे घरात अडकल्याने भूक लागल्यावर घरात काहीतरी असावं म्हणूनही अनेकांनी पारले जी बिस्किट मोठ्या प्रमाणात विकत घेतली होती. तर काही ठिकाणी गरजूंना वाटप करण्यासाठी काही समाजसेवी संस्था तसंच इतरांनाही पारले जी बिस्किटाचा पर्यायच निवडला होता. याचा मोठा फायदा पारले जी कंपनीला झाला आहे.

१९३८ पासून घराघरात पोहोचलेल्या पारले जी बिस्किटाने लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीची नोंद केली आहे. पारले जी बिस्किटाची निर्मिती करणाऱ्या पारले प्रोडक्ट्सने नेमकी किती विक्री झाली आहे याची सविस्तर आकडेवारी देण्यास नकार दिला आहे. पण गेल्या आठ दशकातील आकडेवारी पाहता मार्च, एप्रिल आणि मे हे सर्वोत्तम महिने राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“एकूण मार्केट शेअरमध्ये आमची एकूण ५ ट्क्के वृद्धी झाली आहे. पण त्यातही ८० ते ९० टक्के वृद्धी ही केवळ पारले-जीच्या विक्रीमुळे झाली आहे. हे अनपेक्षित आहे,” असे पारले प्रोडक्ट्सचे मयांक शाह यांनी सांगितले. २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी बिस्किटांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना काम सुरु कऱण्याची परवानगी देण्यात आली होती. काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची व्यवस्थाही केली होती. एकदा काम सुरु झाल्यावर त्यांचं सर्व लक्ष जास्तीत जास्त विक्री कशी होईल याकडे लागलं होतं.

गेल्या तीन महिन्यात फक्त पारले जी नाही तर इतर बिस्किटांच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ पहायला मिळाली. ब्रिटानियाच्या गुड डे, टायगर, मिल्क बिकी, बॉरबॉर्न आणि मारी तर पारलेच्या क्रॅकजॅक, मोनॅको आणि हाईड अँण्ड सिक यांच्याही विक्रीतही कमालीची नोंद झाली आहे.

“लॉकडाउनदरम्यान पारले जी बिस्किटाने अनेकांचं अन्न होतं. हे सामान्य माणसाचं बिस्किट आहे, जे कोणालाही परवडू शकते,” असं शाह सांगतात. अनेक राज्यांनी आपल्याकडे बिस्किटांची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्य सरकारं आपल्याकडे वारंवार किती स्टॉक आहे याची माहिती घेत होते असंही त्यांनी सांगितलं आहे.

पारले प्रोडक्ट्सच्या एकूण १३० कंपन्यात भारतात आहेत जिथे बिस्किटांची निर्मिती केली जाते. यामधील १० जागा त्यांच्या मालकीच्या आहेत. २०२० मधील उत्पन्न पाहता पारले प्रोडक्ट्सने ३६ ते ३७ हजार कोटींची कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 4:03 pm

Web Title: coronavirus lockdown parle g books best sales achieved unique milestone sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कमल न तोड़ ले ये हाथ कहीं …; शशी थरूर यांचा राजनाथ सिंग यांना टोला
2 केरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू, अंगावर आढळल्या जखमा
3 ज्योतिरादित्य शिंदे करोना पॉझिटिव्ह; दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू
Just Now!
X