News Flash

लॉकडाउन उठणार का? उद्याच्या ‘मन की बात’कडे भारताचं लक्ष

उद्या 'मन की बात' मध्ये नरेंद्र मोदी कोणत्या घोषणा करणार ? देशवसियाचं लक्ष

काही दिवसांपूर्वी एका राष्ट्राच्या नेत्याला मास्क न घातल्यामुळे दंड ठोठावण्यात आला. भारतातही आपल्याला अशीच परिस्थिती तयार करायची आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासियांसी संवाद साधणार आहेत. उद्या म्हणजेच ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच महत्त्वाच्या विषयांवर मन की बातच्या माध्यमातून देशातील नागरिकांना संबोधित करत संवाद साधत असतात. पण यावेळी सर्वांचं लक्ष  लॉकडाउनसंबंधीच्या निर्णयाकडे असणार आहे. ३१ मे रोजी लॉकडाउनचा चौथा टप्पा संपत अल्याने नरेंद्र मोदी नेमकी काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

याआधी नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’साठी लोकांकडून सूचना, संकल्पना तसंच विषय मागवले होते. नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलं होतं. योगायोगाने ३१ मे रोजीच लॉकडाउन संपत असल्याने नरेंद्र मोदी लॉकडाउन उठवणार का ? की लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात होईल याकडे देशाचं लक्ष आहे.

दरम्यान शुक्रवारी अमित शाह यांनी लॉकडानच्या संभाव्य मुदतवाढीबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बहुतेक मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचा कालावधी आणखी १५ दिवसांनी वाढवण्याची मागणी केली असल्याने १ जूनपासून लॉकडानचा पाचवा टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील विविध आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली. टाळेबंदीच्या संभाव्य पाचव्या टप्प्यात कोणत्या व्यवहारांना मुभा द्यायची यावर केंद्राला निर्णय घ्यावा लागणार आहे. देशभरात २४ मार्च, १५ एप्रिल, ३ मे आणि १७ मे असा चार वेळा लॉकडाउन जाहीर केला गेला. या काळात करोनासंदर्भातील सर्व निर्णय राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण कायद्यांतर्गत घेण्यात आले. लॉकडाउनच्या संभाव्य पाचव्या टप्प्यात या कायद्याची अंमलबजावणी कायम ठेवायची की, राज्यांना अधिकार द्यायचे यावर केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. आरोग्य हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असल्याने हा कायदा लागू न केल्यास करोनासंदर्भातील सर्व निर्णय राज्यांना घ्यावे लागतील.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दूरध्वनीद्वारे सर्व मुख्यमंत्र्यांची भूमिका जाणून घेतली. महाराष्ट्राने जूनमध्येही टाळेबंदी कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. कर्नाटक सरकारने धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी केली असली तरी, अन्य राज्यांतील प्रवाशांना येण्यास मनाई केली आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणाने दिल्लीची सीमा बंद केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी श्रमिक रेल्वेगाडय़ांच्या राज्यातील प्रवेशालाही विरोध केला आहे. आणखी दोन आठवडय़ांसाठी टाळेबंदी वाढवली जाऊ शकते, असे संकेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनीही दिले आहेत. शाळा-महाविद्यालये बंदच ठेवावीत, असे जैन यांचे मत आहे. गरज असेल तर टाळेबंदीला मुदतवाढ देऊ, असे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 11:00 am

Web Title: coronavirus lockdown pm narendra modi to address nation through mann ki baat sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चीनच्या नागरिकांवर निर्बंध घालण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प; केल्या मोठ्या घोषणा
2 Coronavirus: महाराष्ट्रातून परतलेल्या ८० वर्षीय आईला घरात घेण्यास मुलांचा नकार
3 Mitron अ‍ॅप आमच्याकडून केवळ अडीच हजारांना घेतलं विकत; पाकिस्तानी कंपनीचा दावा
Just Now!
X