News Flash

“उत्तर प्रदेश सीमेवर बेकायदेशीर येणाऱ्यांना प्रवेश देऊ नका”, योगी आदित्यनाथ सरकारचे आदेश

मजुरांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनांनतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आक्रमक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. (संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशात अनेक स्थलांतरित मजुरांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनांनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी आदेश देताना जिल्हाधिकाऱ्यांना कोणत्याही परवानगीविना राज्यात प्रवेश कऱणारी वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत अशा वाहन मालक आणि चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी मजुरांना आपल्या घरी पाठवण्यासाठी एक योग्य व्यवस्था करण्याची गरज असून त्यांच्या अन्न आणि पाण्याची काळजी घेतली पाहिजे असंही सांगितलं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे की, “पोलिसांनी पायी चालत येणाऱ्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे”. नियमांचं कडक पालन केलं पाहिजे असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी त्यांनी मजूर, कामगारांना आपला आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालून पायी अथवा बेकायदेशीर वाहनाने प्रवास करु नका असं आवाहन केलं. आपलं सरकार प्रत्येकाला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक आपल्या घरी पोहोचवण्यासाठी युद्धस्तरावर काम करत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

राज्य सरकार प्रवासी मजूर, कामगारांना ट्रेन प्रवासासाठी तिकीटाचे कोणतेही पैसे आकारत नसल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. याआधीही योगी आदित्यनाथ यांनी प्रवासी मजुरांना पायी किंवा खासगी वाहनाने येऊ नका असं आवाहन केलं आहे. सीमेवर पोहोचणाऱ्या मजूर, कामगारांच्या अन्न, पाण्याची व्यवस्था केली जावी आणि तपासणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची सुविधा केली जावी असा आदेश आधीच त्यांनी दिला आहे.

लॉकडाउन सुरु असल्याने घराकडे निघालेल्या २४ मजुरांचा उत्तर प्रदेशमधील औरैयामध्ये झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. यापैकी एका ट्रकमध्ये ८० मजूर असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी २३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला. या अपघातामध्ये १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख तर गंभीर जखमींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत जाहीर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 7:52 pm

Web Title: coronavirus lockdown uttar pradesh cm yogi adityanath seize vehicles illegally ferrying migrants sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राहुल गांधी यांनी जाणून घेतल्या पायी चालणाऱ्या मजुरांच्या व्यथा
2 लाऊडस्पीकरवरुन अजान देणे हा इस्लाम धर्माचा भाग नाही – अलाहाबाद उच्च न्यायालय
3 करोना संकटाचा सामना करण्यासाठी अझीम प्रेमजी यांचा मोदी सरकारला महत्त्वाचा सल्ला
Just Now!
X