News Flash

लुडो खेळताना शिंकल्यानंतर ‘हा घे करोना’ म्हणाल्याने संतापलेल्या मित्राने थेट गोळीच घातली

चौघेजण लुडो खेळताना अचानक एक जण शिंकला त्यानंतर...

रुग्णालयामध्ये दाखल असलेला प्रशांत (फोटो: एएनआय)

उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील ग्रेटर नोएडामध्ये लुडो खेळताना खोकल्यावरुन वाद झाल्याने एका व्यक्तीने आपल्या मित्रावरच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील दयानगरमधील मंदिराजवळ काहीजण लुडो खेळत होते. त्यावेळी एकजण खोकला आणि त्यानंतर त्याने हा घे करोना असं विनोद केला. यावरुन झालेल्या वादामधून त्याच्या मित्राने देशी बनावटीच्या पिस्तुलीमधून या व्यक्तीवर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून अनेकजण गोळा झाले. मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीला रुग्णालयामध्ये दाखल केलं.

ग्रेटर नोएडाचे पोलिस उपायुक्त राजेश कुमार सिंग यांनी एआयएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ‘मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. एका व्यक्तीने त्याच्यासोबत लुडो खेळत असणाऱ्या व्यक्तीवर गोळीबार केला. या दोघांमध्ये शिंकण्यावरुन भांड झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे,’ असं सिंग यांनी स्पष्ट केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयवीर उर्फ गुल्लू आणि प्रशांत उर्फ प्रवेश हे दोघे इतर दोन मित्रांबरोबर साईथाली मंदिराजवळ लुडो खेळत होते. हे चौघे लुडो खेळत असतानाच प्रशांतला शिंक आली. त्यामुळे संतापलेल्या गुल्लूने ‘तुला करोना पसरवायचा आहे का?’ असा सवाल विचारला. त्यावेळी प्रशांतने पुन्हा एकदा गुल्लूला डिवचण्यासाठी शिंकण्याचं नाटक केलं आणि ‘हा घे करोना’ असं मस्करीमध्ये म्हटलं. प्रशांतने केलेल्या मस्करीमुळे गुल्लूचा पार चढला शाब्दिक बाचाबाचीवरुन सुरु झालेला वाद हणामारीपर्यंत वाढला आणि त्यामधूनच संतापलेल्या प्रशांतने त्याच्याकडील देशी पिस्तुलीमधून गुल्लूवर गोळीबार केला.

गुल्लूने आपल्यावर हल्ला केला तेव्हा तो दारुच्या नशेत होता असं प्रशांतने एनएनआयशी बोलताना सांगितलं आहे. “आम्ही लुडो खेळताना हा सर्व प्रकार घडला. आधी आम्ही तिघे खेळत असताना गुल्लू तिथे आला. तो आला तेव्हाच त्याने दारु प्यायल्याचे जाणवत होते. आल्याआल्याच त्याने तुम्ही इथे काय करत आहात असा प्रश्न विचारला. त्यावर मी उत्तर दिल्यानंतर तो संतापला आणि आमच्याशी वाद घालू लागला,” असं प्रशांतने म्हटलं आहे.

आरोपी गुल्लू आणि प्रशांत दोघेही शेतकरी आहेत. प्रशांतला ग्रेटर नोएडामधील कैलाश रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. गुल्लूने प्रशांतच्या पायावर गोळी चालवली होती. याप्रकरणामध्ये पोलीस आता गुल्लूचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 4:05 pm

Web Title: coronavirus man shot at after he coughs while playing ludo in greater noida scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 उत्तर प्रदेशात एक्स्प्रेस-वेवर उतरलं भारतीय हवाई दलाचं हेलिकॉप्टर
2 कुवेतच्या मदतीसाठी भारताने पाठवली लष्कराची रॅपिड रिसपॉन्स टीम
3 करोना विषाणू शरीराच्या बाहेर काढून जिवंत ठेवणं म्हणजे नेमकं काय? नीट समजून घ्या
Just Now!
X