30 May 2020

News Flash

भारताच्या ‘मँगो मॅन’चा करोना योद्ध्यांना अनोखा सलाम; विकसित केला ‘पोलीस आंबा’ आणि ‘डॉक्टर आंबा’

करोनायोद्ध्यांना समर्पित करण्यासाठी दोन नवीन वाण विकसित केले

फाइल फोटो (फोटौ सौजन्य: एएनआय)

देशामध्ये करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र अशा परिस्थितीमध्येही अत्यावश्यक सेवा पुरवणारे डॉक्टर आणि पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. अगदी सेलिब्रिटीजपासून ते नेत्यांपर्यंत आणि पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी या करोनायोद्ध्यांचे कौतुक केलं आहे. भारताचे मँगो मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाजी कलीमुल्लाह खान यांनीही अगदी हटके पद्धतीने या कोवीड योद्ध्यांना समाल केला आहे. आंब्याच्या वेगवेगळे वाण विकसित करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाले्या खान यांनी नुकत्याच दोन नवीन वाण तयार केले आहे. हे दोन्ही वाण त्यांनी कोवीड योद्ध्यांना समर्पित करत एका वाणाचे नाव ‘डॉक्टर आंबा’ तर दुसऱ्याचे ‘पोलीस आंबा’ असं ठेवलं आहे. ‘द बेटर इंडिया’ या वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बायगत शेतीचे तज्ज्ञ असणाऱ्या खान हे कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या मदतीतून आठ एकर जमिनीमध्ये १६०० वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या वाणांचे उत्पादन घेतात. उत्तर प्रदेशमधील महिलाबाद येथे खान कुटुंबाच्या २० एकर जमिनीवर आंब्याच्या बागा आहेत. त्यापैकी ८ एकरावर कलीमुल्लाह हे आंब्याची नवीन नवीन कलम तयार करुन प्रयोग करत असतात. त्यांनी कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हणजेच ग्राफ्टींगच्या माध्यमातून एकाच झाडावर ३०० प्रकराच्या आंब्यांचे उत्पादन घेतलं होतं. आंबा संशोधन आणि बागायती शेतीमधील प्रयोगशिलतेसाठी त्यांना २००८ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.

कलीमुल्लाह हे त्यांच्या प्रयोगांबरोबर नवीन आंब्याचा वाण विकसित केला की खास काम करणाऱ्या व्यक्तींचे नाव त्या वाणाला देण्यासाठी ओळखले जातात. सध्या करोनामुळे देशातील आंबा उत्पादकांना फटका बसला आहे. ऐन आंबा विक्रिच्या कालावधीमध्ये करोनामुळे देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या परिस्थितीमध्येही लोकांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांचे कौतुक करण्यासाठी कलीमुल्लाह यांनी दोन खास वाण निर्माण केले आहेत. या वाणांना त्यांनी  ‘पोलीस आंबा’ आणि ‘डॉक्टर आंबा’ असं नाव ठेवलं आहे.

“करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये पहिल्या फळीत काम करणाऱ्या करोना योद्ध्यांना समर्पित करण्यासाठी मी दोन नवीन वाण बनवले आहेत. हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चे प्राण धोक्यात घालणारे हे करोना योद्धे खऱ्या अर्थाने हिरो आहोत. कामाबद्दल असणारी त्यांची श्रद्धा आणि निस्वार्थ भाव खरोखच कौतुकास्पद आहे. त्यांचा गौरव करण्यासाठीच मी दोन वाण विकसित केले असून या वाणांना त्यांचे नाव देणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,” असं कलीमुल्लाह यांनी ‘द बेटर इंडिया’शी बोलताना सांगितले.

“आपआपल्या क्षेत्रामध्ये अतुलनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची नावे मी तयार केलेल्या नवीन वाणांना देत असतो. त्यांच्या कामांमुळे जगावर झालेल्या सकारात्मक परिणामांचे कौतुक करण्याची ही माझी पद्धत आहे. त्यांचे नाव आंब्यांना देऊन त्यांचा गौरव करण्याचा माझा हेतू असतो,” असं कलीमुल्लाह यांनी स्पष्ट केलं. १९८७ पासून कलीमुल्लाह हे काम करत इआहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 10:12 am

Web Title: coronavirus mango man of india haji kalimullah khan creates police and doctor varieties to honour covid 19 heroes scsg 91
Next Stories
1 “सगळीकडे नुसता धूर आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या, मी कसाबसा…” ‘त्याने’ सांगितलं विमानात काय घडलं
2 Coronavirus : देशभरात चोवीस तासांत 6 हजार 654 नवे रुग्ण, 137 मृत्यू
3 Audio Clip: ‘हे’ ठरले वैमानिकाचे शेवटचे शब्द; कराची विमानतळावरील ATC बरोबर संवाद साधताना म्हणाला…
Just Now!
X