News Flash

धक्कादायक! बेपत्ता करोना रुग्णाचा रुग्णालयाजवळच मृतदेह सापडल्याने खळबळ

बेपत्ता रुग्णाचा मृतदेह सापडल्याने उत्तर प्रदेशात खळबळ

ससूनमध्ये मागील दहा दिवसांच्या काळात ४२ करोना पॉझिटिव्ह असलेल्या महिला बाळंत झाल्या आहेत. त्यापैकी सहा बाळांना करोनाचा संसर्ग झाला होता. मात्र हा संसर्ग प्रसुतीनंतर झाला होता. (फोटो : संग्रहित/REUTERS)

उत्तर प्रदेशात रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ५५ वर्षीय करोनाच रुग्णाचा रुग्णालयापासून ५०० मीटर अंतरावर झुडुपांमध्ये मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्ण बेपत्ता झाल्यानंतर २४ तासातच मृतदेह आढळला आहे. प्रयागराज येथील एसआरएन रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. शनिवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास रुग्ण बेपत्ता झाला होता. रुग्णासारखी दिसणारी व्यक्ती रुग्णालयातून बाहेर पडत असल्याचं सीसीटीव्हीदेखील समोर आलं होतं.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याच्या घराजवळ रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याला मृतदेह दिसला. त्यानेच पोलिसांना कळवलं. रुग्णाच्या कुटुंबाने रुग्णालयाकडून योग्य उपचार आणि वागणूक दिली गेली नसल्याचा आरोप केला आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले आहेत.

आणखी वाचा- चिंताजनक! देशातील करोनाबळी ३२ हजारांच्या पुढे

शहर पोलीस अधिक्षक दिनेश कुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं आणि शनिवारी ते बेपत्ता झाले. कुटुंबाने बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली होती. शनिवारी रात्रीपासून रुग्णाचा फोन स्वीच ऑफ  लागत असल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आपण थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही रुग्णाने पळ काढला असल्याचं सांगितलं .

आणखी वाचा- … म्हणून करोनाबाधित रुग्णाला धक्के देऊन रुग्णवाहिकेतून रस्त्यातचं उतरवलं

रुग्णाच्या मुलीने केलेल्या दाव्यानुसार, फोनवर आपल्याशी बोलताना वडिलांनी वॉर्डमधील असुविधांबद्दल सांगितलं होतं. कुटुंबाने ऑडिओ क्लिपदेखील प्रसिद्ध केली आहे. “माझं तोंड रात्रभर सुकलं होतं. व्हेंटिलेरमुळे मला श्वास घेतानाही त्रास होत होता. मी काही जणांना मदतीसाठी हाक मारली पण कोणीही लक्ष दिलं नाही असं रुग्ण सांगत असल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 4:00 pm

Web Title: coronavirus missing patient found dead after 24 hours in uttar pradesh sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक, घरात कोणी नाही पाहून सासऱ्याने सुनेकडे केली शरीरसुखाची मागणी
2 यूजीसी मार्गदर्शक नियमावलीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरची सुनावणी पुढच्या सोमवारी
3 राजस्थानात भाजपाला धक्का; सहा आमदारांविरोधातील याचिका न्यायालयानं फेटाळली
Just Now!
X