News Flash

Coronavirus : “आपल्याला तज्ज्ञांपेक्षा जास्त कळतं असं मोदींना वाटतं असल्याने भारतावर ही वेळ आलीय”

"सध्याची मोदींची धोरणं ही नाट्यमय आणि नेत्रदीप ठेवण्यास प्राधान्य दिलं जातंय"

फाइल फोटो (सौजन्य: एएनआय वरुन साभार)

इतिहासकार आणि राजकीय क्षेत्रातील जाणार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामचंद्र गुहा यांनी सध्या देशात उद्भवलेल्या करोनाच्या गंभीर समस्येसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. करोना परिस्थिती हाताळण्यात भारताला आलेलं अपयशासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची शैलीच मुख्यपणे कारणीभूत असल्याचं गुहा म्हणाले आहेत. प्रसिद्ध पत्रकार करण थापा यांना द वायरसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये गुहा यांनी मोदींनी करोना परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळ्याची टीका केलीय.

गुहा यांनी या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदीच्या सायकोफाँटिक कॅबिनेटला दोष दिला आहे. (सायकोफाँटिक म्हणजेच प्रत्येक गोष्टीच स्वत:चा स्वार्थ शोधणारे.) यामध्ये मोदींच्या आजूबाजूला असणारे त्यांच्या होमध्ये हो मिळवणारे अधिकारी, भारतीयांना निराश करणारे सर्वोच्च न्यायालयही जबाबदार असल्याचं गुहांनी म्हटलं आहे. मात्र या साऱ्या गोंधळासाठी मोदींनाच जबाबदार धरावं लागेल असंही गुहा म्हणाले आहेत.

“तज्ज्ञ आणि तज्ज्ञांच्या ज्ञानाचा अवामान. तज्ज्ञांच्या शिक्षणाला फारसा मान न देण्याची वृत्ती मोदींची आहे,” असं गुहा म्हणाले आहेत. “हार्वर्डपेक्षा हार्ड वर्कला आपण प्राधान्य देतो या मोदींच्या वक्तव्यावरुन त्यांचे शिक्षणाबद्दलचे प्रेम दिसून येतं,” असा टोलाही गुहा यांनी या मुलाखतीमध्ये लगावला आहे.

“मला तज्ज्ञांची गरज नाही असं मोदींच म्हणाले होते. आपल्याला तज्ज्ञांपेक्षा जास्त कळंत असं मोदींना वाटतं. ते फक्त अशाच तज्ज्ञांचा सल्ला घेतात जे त्यांना अपेक्षित उत्तर देतात,” असंही गुहा यांनी मुलाखतीमध्ये मोदींच्या सल्लागारांबद्दल बोलताना म्हटलं आहे. पुढेच याच गोष्टींचा संबंध गुहा यांनी करोना परिस्थितीशी जोडला आहे. करोना परिस्थिती हाताळताना मोदींनी तज्ज्ञांना प्राधान्य देण्याऐवजी नाट्यमय धोरणं आखण्यासाला प्राधान्य दिल्याचं गुहा म्हणाले आहेत.

“देशात सध्या उद्भवलेली करोना परिस्थिती आता इतकी गंभीर नसती तर पंतप्रधांनी त्यांची धोरणं भारतातील उत्तम साथरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तयार केली असती. सध्याची मोदींची धोरणं ही नाट्यमय आणि नेत्रदीप ठेवण्यास प्राधान्य दिलं जातंय,” असंही गुहा यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. थाळ्या वाजवणं, दिवे लागवणं, घरातील लाईट्स नऊ मिनिटांसाठी बंद करणं हे सारे प्रकार म्हणजे लोकप्रियता आणि अंधश्रद्धा असल्याचंही गुहा यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 5:07 pm

Web Title: coronavirus modi leadership main reason for covid mishandling ramachandra guha scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 जाणून घ्या पंतप्रधानांच्या आजच्या बैठकीतले प्रमुख मुद्दे….
2 आता ऑक्सिजनचीही चोरी? लिक्विड ऑक्सिजन नेणारा आख्खा टँकर गायब!
3 पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य
Just Now!
X