News Flash

#Coronavirus: टॉयलेट पेपरचा तुटवडा झाल्याने वृत्तपत्राने वाढवली पानांची संख्या

करोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातलं असून ९७ हजार जणांना लागण झाली आहे.

#Coronavirus: टॉयलेट पेपरचा तुटवडा झाल्याने वृत्तपत्राने वाढवली पानांची संख्या
वृत्तपत्राने वाढवली पानांची संख्या

करोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातलं असून ९७ हजार जणांना लागण झाली आहे. ८५ देशांमध्ये करोना व्हायरसने घुरखोरी केली असून आतापर्यंत ३३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. भारतातही करोना व्हायरसने शिरकाव केला असून आतापर्यंत ३० जणांना याची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी प्रत्येक देशाने आपल्या नागरिकांसाटी विशेष सूचना केल्या आहेत. सोबतच सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहनही वारंवार करण्यात येत आहे. मात्र लोकांमध्ये भीती निर्माण झाली असल्याने अनेक जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. याशिवाय सॅनिटायजर, टॉयलेट पेपर यासारख्या गोष्टींचाही तुटवडा भासू लागला आहे.

विशेष म्हणजे सोशल मीडियावर #ToiletPaperEmergency #ToiletPaperApocalypse हे हॅशटॅग ट्रेडिंग होत आहेत. ऑस्ट्रेलियातील नागरिकांसमोर टॉयलेट पेपरचा तुटवडा निर्माण झाला असल्याने मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, एनटी न्यूज या वृत्तपत्राने लोकांची टॉयलेट पेपरची समस्या सोडवण्यासाठी पानांची संख्या वाढवली आहे. तुमचा विश्वास बसत नसेल, पण हे खरं आहे.

वृत्तपत्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्यांनी हो आम्ही खऱंच केलं आहे (Yes, we actually did it) अशी कॅप्शनही दिली आहे. यावेळी त्यांनी #toiletpapercrisis हा हॅशटॅगही वापरला आहे.

वृत्तपत्राने एकूण आठ पानं वाढवली असून ही पानं कापून त्यांचा टॉयलेट पेपर म्हणून वापर केला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये टॉयलेट पेपरची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये तुटवडा निर्माण झाला असल्याने वृत्तपत्राकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून लोकांनी आपली गरज जाणून घेतल्याबद्दल वृत्तपत्राचे आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2020 1:10 pm

Web Title: coronavirus newspaper extra pages toilet paper crisis australia sgy 87
Next Stories
1 वारंवार लग्न कधी करणार विचारणाऱ्या शेजारणीची तरुणाकडून हत्या
2 स्वस्त झाला Vivo चा चार रिअर कॅमेऱ्यांचा फोन, कंपनीकडून किंमतीत कपात
3 Realme 6 Pro आणि Realme 6 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Just Now!
X