जगभरात करोना व्हायरस या महामारीने हाहाकार माजवला आहे. जगातील सर्वात शक्तीशाली देश असलेल्या अमेरिकेनंही या रोगापुढं पाय टेकवलं आहेत. अमेरिकेत तीन लाखांहून अधिक जणांना करोना व्हायरसची लागण झाली आहे तर आठ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्याधर्तीवरच शनिवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोन चर्चा झाली. यावेळी ट्रम्प यांनी करोनाविरुद्ध लढ्यात भारताकडे मदतीची विनंती केली आहे. ट्रम्प यांनी भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधांचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. पण नेमका हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर काय ? करोनावर हे औषधं प्रभावी ठरेल का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औषधांची निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणात हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची निर्मिती करतात. मलेरियासारख्या घातक आजारावर हे औषध उपयुक्त ठरते. भारतामध्ये प्रत्येकवर्षी कोट्यवधी लोकांना मलेरिया होतो. त्यामुळेच भारतात हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जाते.

विशेष म्हणजे, अमेरिकेत करोना व्हायरसच्या रूग्णांना हे औषधं दिलं जात असून ते प्रभावी ठरत आहे. त्यामुळेच या औषधाची मागणी वाढली आहे. ट्रम्प यांनी मोदींशी चर्चा करून या औषधांचा पुरवठा करावा अशी विनंती केली आहे. पण कच्चा मालाअभावी भारतामध्ये सध्या या औषधांचं उत्पादन घटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही असं आश्वासक बोलसोनारो यांनी दिलं. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्मितीसाठी भारत चीन आणि ब्राझील या दोन देशांकडून बहुतांश कच्चा माल आयात करतो.

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे एक टॅबलेट असून एण्टी मलेरिया ड्रग क्लोरोक्वीनपेक्षा थोडं वेगळं आहे. याचा वापर ऑटोइम्यूनसारख्या आजारावर केला जातोय. सध्या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषधं करोना व्हायरसवरही प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. सार्स-सीओवी-२ यावर हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा प्रभाव तिव्रतेनं पडत आहे. सार्स-सीओवी-२ हे करोना व्हायरस होण्याचं कारण असल्याचं म्हटलेय. त्यामुळेचं हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे करोनावर प्रभावी ठरत आहे.

भारताकडून निर्यातीवर बंदी –
भारत सरकारने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशांत या औषधांचा मुबलक साठा नाही. भारतामध्ये याची गरज जास्त आहे. त्यामुळे बंदी घालण्यात आली आहे.

कधी वापरावं हे औषधं ?
करोना व्हायरसला रोखण्यासाठी भारताच्या राष्ट्रीय टास्क फोर्सने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध वापरण्याची शिफारस केली आहे. करोना व्हायरसच्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापन केली आहे. हायड्रोक्सी क्लोरोक्वीनचा सरसकट वापर करता येणार नाही. इर्मजन्सीच्या प्रसंगात हे औषध वापरता येईल. राष्ट्रीय टास्क फोर्सच्या या शिफारशीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) मंजुरी दिली आहे. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध करोना व्हायरस विरोधात प्रभावी ठरत असल्याचे अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. १५ वर्षाच्या आतील मुलांवर हे औषध वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. अ‍ॅडव्हायजरीनुसार नोंदणीकृत डॉक्टरने प्रिस्क्रिप्शनवर लिहिले असेल तरच हे औषध मिळू शकते.

ट्रम्प यांनी आधीच दिले होते संकेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना व्हायरसवर हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि एज़िथ्रोमाइसिन या औषधांना एकत्रिक करून घेतल्यास प्रभावी ठरू शकते असे संकेत दिले होते. २१ मार्च रोजी ट्रम्प यांनी ट्विट केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus outbreak in america hydroxychloroquine tablet trump ask modi nck
First published on: 05-04-2020 at 17:18 IST