News Flash

मोठा झटका…AstraZeneca ने थांबवली ऑक्सफर्ड लसीची चाचणी

भारतातही या लसीची चाचणी सुरु करण्यात आली होती

संग्रहित (Photo: Reuters)

करोनाविरोधातील लढ्यात मोठा धक्का बसला आहे. करोना संकट रोखण्यासाठी सर्वात जास्त अपेक्षा असणाऱ्या ऑक्सफर्डच्या AZD1222 लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची करोना लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यानंतर करोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्लूमबर्गने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटीश-स्वीडिश कंपनी AstraZeneca Plc ची ही लस संपूर्ण जगासाठी एक आनंदवार्ता देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. भारतातही या लसीची चाचणी सुरु करण्यात आली होती. ब्रिटनमध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवेळी एका व्यक्तीला लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडली असून काही दुष्परिणाम जाणवले. या व्यक्तीला रुग्णालयातही दाखल करावं लागलं.

या व्यक्तीला नेमका काय त्रास होत आहे याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने प्रकृती लवकर बरी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. करोना लसीच्या चाचणीदरम्यान तिला थांबवणं नवीन गोष्ट नाही, पण यामुळे जगभरात लवकरात लवकर करोना लस उपलब्ध होण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि AstraZeneca Plc ची ही लस स्पर्धेत सर्वात पुढे होती.

ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात २०२१ च्या सुरुवातील लस उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली होती. भारतासहित जगभरातून ही लस मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर येण्यास सुरुवात झाली होती. करोनामुळे जगभरात आतापर्यंत ८ लाख ९४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान AstraZeneca Plc च्या प्रवक्त्यांनी लस दिलेल्या व्यक्तीच्या आजाराचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे.

चाचणीदरम्यान आजारी पडण्याची शक्यता असते, पण याची स्वतंत्रपणे काळजीपूर्वक माहिती घेणं गरजेचं असल्याचंही प्रवक्त्याने सांगितलं आहे. सोबतच वेगाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत माहिती घेण्याचा प्रयत्न आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या चाचणीत दोघांना लस देण्यात आली होती. यावेळी त्यांच्यात रोग प्रतिकारशक्ती विकसित झाली होती.

ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांनी करोना लस फक्त यशस्वी होणार नाही तर सप्टेंबरमध्ये लस उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केली होता. ऑक्सफर्डच्या या लसीचं उत्पादन AstraZeneca करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 8:37 am

Web Title: coronavirus oxford university astrazeneca vaccine trial paused after unexplained illness sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “रियावर जेवढ्या अमली पदार्थांसाठी गुन्हा दाखल केलाय तेवढा तर गांजा दिल्लीच्या रस्त्यावर मिळतो”
2 २१ सप्टेंबरपासून सुरू होणार ‘या’ इयत्तांच्या शाळा; केंद्राकडून नियमावली जाहीर
3 चीनने अपहरण केलेले पाच तरुण लवकरच भारताच्या ताब्यात
Just Now!
X