News Flash

ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू न झाल्याचा दावा खोडून काढणारा गडकरींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाले नसल्याची माहिती केंद्राने अधिवेशनादरम्यान सभागृहात दिली

नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल (photo pti)

करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाले नसल्याची माहिती केंद्राने अधिवेशनादरम्यान सभागृहात दिली. त्यामुळे राजकीय गोंधळ उडाला आहे. करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यात ऑक्सिजनचा अभाव असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत होत्या. मात्र, सरकारने हे वृत्त फेटाळले आहे. त्यामुळे सरकारच्या विधानावर लोक सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करीत आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेसस नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू न झाल्याच्या केंद्र सरकारच्या दाव्यावरुन हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू न झाल्याचा सरकारचा दावा खोडून काढणारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नितीन गडकरी असे म्हणतात की, ‘”कोविडच्या या काळात आपल्या देशातील अनेक लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपला जीव गमवावा लागला.”

“म्हणून करोना काळात मृत्यू झाले”, प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

केंद्राने काय सांगितलं आहे

पहिल्या लाटेत मेडिकल ऑक्सिजनची मागणी ३,०९५ मेट्रिक टन एवढी वाढली. त्यानंतर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी ९,००० मेट्रिक टन पर्यंत पोहोचली. त्यामुळे केंद्राला राज्यांमध्ये समान वितरणाची सोय करावी लागली असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी राज्यसभेत सांगितले.

देशात करोनाकाळात ४० लाख अतिरिक्त मृत्यू?

राज्यसभेत निवेदन देताना केंद्राने सांगितलं की, आरोग्य हा राज्य सरकारचा विषय आहे. तपशीलवार मार्गदर्शक सूचनांनुसार करोना रुग्णसंख्या आणि मृत्यूची आकडेवारी नियमितपणे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे दिली जाते.

दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड -१९ रूग्णांचा मृत्यू झाला का या प्रश्नाच्या उत्तरावर आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी उत्तर दिले. “आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे बाधितांची आकडेवारी आणि मृत्यूची संख्या केंद्राकडे नोंदवतात.”

ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू न झाल्याच्या दाव्यावर संजय राऊत संतापले; म्हणाले…

“केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूची नोंद करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देतात. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपासून स्वतंत्रपणे ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यूची कोणतीही आकडेवारी आलेली नाही,” असं लेखी उत्तरात सांगण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 1:18 pm

Web Title: coronavirus oxygen shortage second wave health ministry data revealed death nitin gadkari viral video srk 94
टॅग : Corona,Nitin Gadkari
Next Stories
1 “संजय राऊतजी, धक्का तर आम्हाला बसला आहे”, ऑक्सिजनच्या मुद्द्यावर भाजपाचं प्रत्युत्तर!
2 “म्हणून करोना काळात मृत्यू झाले”, प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3 राहुल गांधींच्या ट्वीटवर भाजपा नेत्याची गिरीराज सिंह यांची इटालियन भाषेत पोस्ट; म्हणाले…
Just Now!
X