News Flash

पाकच्या पंतप्रधानांनी पसरले जगासमोर हात : करोनामुळे भूकबळी जाईल, आम्हाला मदत करा

पाकिस्तानचीही अवस्थाही बिकट झाली असून दिवसेंदिवस परिस्थिती भयावह होत चालली आहे.

करोना व्हायरस या महामारीमुळे जगातील अर्थव्यवस्था काही प्रमाणात ठप्प झाली आहे. जवळपास जगातील सर्वच देश या महामारीचा सामना करत असून यातून उभरण्याचा प्रयत्न करत आहेत. करोना व्हायरसमुळे आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानचीही अवस्थाही बिकट झाली असून दिवसेंदिवस परिस्थिती भयावह होत चालली आहे. त्याचधर्तीवर सार्ककडे करोनाच्या नावावर पैसे मागणाऱ्या पाकिस्तानने जागतिक समुदयासमोरही हात पसरले असून आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. आम्हाला आर्थिक मदत करा अन्यथा भूकबळी जातील असेही त्यांनी म्हटलेय.

लॉकडाऊनमुळे देशभरात सर्व व्यवसाय बंद पडल्यामुळे आता पाकिस्तानात उपासमारीची समस्या निर्माण झाली आहे. रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगाला आणि देशाला आवाहन करणारा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर कर केला आहे. त्यामध्ये ते म्हणालेत की, अंतरराष्ट्रीय समुदाय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि अंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांना माझं आवाहन आहे की, या संकटाच्या काळात पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी काही तरी ठोस मोहीम राबवावी. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ करण्यात यावं. दरम्यान, इम्रान खान यांचे हे आवाहन म्हणजे करोनाच्या निमित्तानं देशावर असणारं कर्ज माफ करण्याची मोहीम आहे असं मानलं जात आहे.

व्हिडिओ मेसेजमध्ये इम्रान खान पुढे म्हणालेत की, पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांची अर्थव्यवस्था करोना व्हायरसच्या महामारीचा सामना करण्याइतकी बळकट नाही. जगभरातील मोठ्या संस्थांनी अशा कर्जबाजारी विकसनशील देशांना मदत करण्यासाठी पुढे यावं. तसेचं त्यांच्यावर असणारे कर्ज माफ करावं. मध्यंतरी इम्रान खान यांनी पाकिस्तानसाठी सार्ककडे करोनाविरोधात लढण्यासाठी आर्थिक मदत मागितली होती. आता इम्रान खान यांनी जागतिक समुदायाला मदतीचे आवाहन केले आहे. तसेच पाकिस्तानला तातडीने आर्थिक मदत केली नाही तर करोनाआधीच उपासमारीनं लोकांचा मृत्यू जाईलं असं म्हटलेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2020 11:47 am

Web Title: coronavirus pak pm imran says that starvation situation due to corona seeking help from world nck 90
टॅग : Coronavirus,Imran Khan
Next Stories
1 करोनामुक्त रुग्णाच्या रक्तामुळे तिघांना ‘जीवनदान’, भारतीय-अमेरिकन नागरिकांचे वाचले प्राण
2 धक्कादायक… नवऱ्याबरोबर भांडण झालं म्हणून मुलांना नदीत फेकलं
3 धक्कादायक! लॉकडाउनमुळे मित्राला सुटकेसमध्ये भरलं आणि घरी आणलं, पण….
Just Now!
X